शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोहरम पारंपारिक पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:08 IST

मालेगाव येथील मुस्लिम बांधवांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत पारंपारिक पद्धतीने मोहरम साजरा करण्यात येत आहे.

आझादनगर : मालेगाव येथील मुस्लिम बांधवांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत पारंपारिक पद्धतीने मोहरम साजरा करण्यात येत आहे.मोहरम निमित्ताने शहरातील सुन्नी पंथीय मुस्लिम बांधवांतर्फे ताबुतची प्रतिकृती बनविण्यात येते. या महिन्याच्या ९ तारखेस सायंकाळी (आसिरच्या नमाजनंतर) ताबुत घराबाहेर काढण्यात येतो. या निमित्ताने शहरातील इस्लामपुरा भागातील चांदणी चौकातील सुमारे ७० वर्षापासून चांदीपासून बनविण्यात येणारी चांदीची ताबुत बघण्यासाठी अबालवृद्धांसह महिलावर्गाची मोठी गर्दी झाली होती. १९४७ पासून बनविण्यात येणारी चांदीच्या ताबुत सध्या १५ किलो चांदी व १० तोळे सोने आहेत. त्यामुळे याबद्दल मुस्लिम बांधवांमध्ये विशेष आकर्षण आहे. करबला येथील युद्ध हे सत्य व असत्याचे होते. यजीद नामक बादशाह व त्याच्या आठ हजार सैन्याकडून हजरत इमाम हुसेन व त्यांच्या वंशातील ७२ जणांना वीर मरण आले होते. या करबलाच्या युद्धाबाबत मुस्लिमबांधवांना परिपूर्ण माहिती अवगत व्हावी या उद्देशाने शहरातील सुन्नी इस्लामी, रजा अ‍ॅकेडमी, सुन्नि जामेतुल उलमा, सुन्नि जमियत इस्लामसह सुन्नि दावत-ए- इस्लामी संघटनेतर्फे मौलाना सय्यद आमिनुल कादरी हे गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन करबलाची माहिती विशद करतात. मोहरमच्या ११ तारखेस शहरातील ताबुतांचे गिरणा-मोसम संगमावर विसर्जन करण्यात येते. हजरत इमाम हुसेन यांना आलेल्या हुतात्मबद्दल सिया पंथियांकडून शोक व्यक्त करण्यात येतो. यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन श्रद्धांजली देण्यात येते. त्यानुसार मोहरमच्या ७ तारखेस सर्व सिया पंथीय बांधवांच्या घरातुन (इच्छेनुसार) मौला अब्बासची हजेरी काढण्यात येते त्यास आलम असे संबोधिले जाते. ९ तारखेस मशिदीमध्ये रात्रभर जागरण करीत प्रबोधन केले जाते. १० तारखेस (यौम-ए-आशुरा) निमित्ताने चंदनपुरी गेट स्थित मुख्य मशिदीपासून आलम व ताबुत निघत सायंकाळी सिया कब्रस्तान पोहचत समारोप केला जातो. यावेळी सिया बांधवांकडून मातम केले जाते. ११ तारखेस रात्री हुसैनी जामा मशिद समोर धगधगत्या विस्तवावरुन चालत पार केले जाते. त्यास आग का मातम असे म्हटले जाते. अशा प्रकारे शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे मोहरम साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक मौलानांतर्फे करबलाबाबत करण्यात येत असलेल्या प्रबोधनपर सभांमुळे समाजात धार्मिक जागृती येत गत अनेक वर्षापासून चालत येत असलेल्या चाली-रुढींना मुस्लिम बांधवांकडून फाटा देण्यात येत आहे.