शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:51 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तपोवनात होणाऱ्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्या निमित्ताने येत्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग या सभेद्वारे फुंकले जाणार आहे.पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) प्रथमच नाशिकला येणार आहेत. मोदी हे सर्वप्रथम विमानाने ओझरला येणार असून, तिथून हेलिकॉप्टरने पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलातील हेलिपॅडवर येणार असून, तिथून सभास्थानी दाखल होणार आहेत. या दौºयात ते केवळ समारोपाच्या सभेत भाषण करणार असून, अन्य कोणताही कार्यक्रम त्यांच्या दौºयात होणार नाही. या सभेसाठी राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री येणार असून त्यांचे रात्री उशिरा आगमन होत होते.नाशिकमध्ये सध्या पावसाळी वातावरण असून बुधवारी (दि. १८) मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत रोड शोच्या वेळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरूवारी होणाºया मोदी यांच्या सभेवरही पावसाचे सावट आहे.जीवघेणी फोटोग्राफी :महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हातातील मोबाइलने अनेकांनी चित्रीकरण केले. परंतु त्याचबरोबर घराच्या बाल्कनी आणि छतावरून करण्यात आले. सध्या ही तरुणाईची आवड असली तरी उत्तमनगरनजीक एका इमारतीच्या छतावरून अशा धोकादायक पद्धतीने छायाचित्रण करणे हे निश्चितच धोकादायक ठरू शकले असते.स्वागताच्या वैविध्यपूर्ण तºहा४कुठे गुलाब पाकळ्यांचा वर्षाव, ढोल-ताशे, कुठे भव्य हार, कुठे कागदी पुष्पांची उधळण, कुठे लेजीम, कुठे क्रेनवर विद्यार्थिनींचा रोप मल्लखांब अशा वैविध्यपूर्ण तºहांनी सिडकोतून आलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. सिडकोतील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांच्या बाल्कनी आणि गच्चींमध्ये उभ्या असलेल्या नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव केला जात होता.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा