शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या कारकिर्दीत विकास शून्य

By admin | Updated: August 1, 2016 01:20 IST

श्याम काळे : आयटकच्या जिल्हा अधिवेशनात सरकारवर टीका

नाशिक : देशातील जनतेला गुजरात मॉडेल आणि विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दोन वर्षांत विकासाच्या दृष्टीने काहीही करता आले नसून या सरकारमुळे केवळ अंबानी व अदानी यांच्यासारख्या उद्योजकांचाच विकास झाला असल्याचा आरोप करीत आयटकचे राज्य सरचिणीस श्याम काळे यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. द्वारका परिसरातीलकॉ. दत्ता देशमुख सभागृहात आयटकच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा आयटक अध्यक्ष दत्ता निकम, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष सुनंदा जरांडे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे, स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राजू देसले, ज्योती नटराजन, सचिन पाटील, संगीता उदमले, सुनीता शर्मा, बाबासाहेब कदम, माया घोलप उपस्थित होते. याप्रसंगी काळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगार विरोधी आहे. सरकारकडून कामगारांच्या मागण्या व समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कामगारांना त्यांचे अधिकार मिळत नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, त्यासाठी आयटक २ सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी संप करणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ आॅगस्टला आयटकचे सभासद रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार हे धनदांडग्या उद्योजकांसाठी काम करीत आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे देशातील संघटित व असंघटित कामगार विविध समस्यांनी ग्रासला असताना कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने अंतर्गत त्रूटी दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राजू देसले यांनी जिल्हा संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रास्ताविक व्ही. डी. धनवटे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. राजपाल शिंदे यांनी केले, तर ओंकार जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)