शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

मोदी सरकारचा नाशिककरांना ठेंगा

By admin | Updated: July 13, 2014 21:57 IST

मोदी सरकारचा नाशिककरांना ठेंगा

नाशिक : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महापालिकेला अच्छे दिन येणार असल्याची अपेक्षा फोल ठरली आहे. पुढील वर्षी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मोदी सरकार भरभरून निधी देणार असल्याचे भाजपाचे मुखंडच नव्हे तर अधिकारीही सांगत होते. प्रत्यक्षात कुंभमेळ्यासाठी अनुदानाची कोणतीही घोषणा न करता भाजपा सरकारने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.यापूर्वी नाशिकमध्ये २००२-०३ मध्ये कुंभमेळा भरला तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार होते. त्यावेळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि ते अनुदान महापालिकेस दिले होते. त्यावेळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मिळून जेमतेम पाचशे कोटी रुपयांचा आराखडा होता. सर्वाधिक मोठा २२५ कोटी रुपयांचा आराखडा नाशिक महापलिकेचा असल्याने सर्वाधिक निधी महापालिकेच्या वाट्याला आला होता. त्यानंतर आता संपूर्ण आराखडा २३०० कोटी रुपयांचा असून, त्यात नाशिक महापालिकेचा वाटा १०५१ कोटी रुपयांचा आहे. इतक्या मोठ्या आराखड्यासाठी राज्य शासन तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचेच अनुदान देणार असून, उर्वरित खर्च पालिकेला करायचा आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पालिकेला खर्च कसा करावा असा प्रश्न पडला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आल्यानंतर उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मोदी हे नाशिकला भरीव निधी देतील असे सांगितले होते. त्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांची भेटही घेण्यात आली होती. परंतु गुरुवारी सादर झालेल्या अंदाजपत्रकात नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने पालिकेचा भ्रमनिरास झाला आहे. (प्रतिनिधी)