शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

मोदी सरकार कामगार विरोधी

By admin | Updated: September 20, 2015 22:59 IST

जे. ए. मजुमदार : नोव्हेंबरमध्ये रेल रोको

सिडको : केंद्रातील मोदी सरकार हे कामगार विरोधी असून, कामगारांच्या विरोधात धोरणे अवलंबत आहेत. त्यामुळेच कामगार अडचणीत आल्याने कामगारांच्या न्याय हक्कासाठी देशपातळीवर जनआंदोलन उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये रेल्वे कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे. ए. मजुमदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.सीटू भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी मजुमदार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार हे कामगार आणि शेतकरी विरोधी आहे. त्यांच्या हिताचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय करत असून कामगार, शेतकरी संकटात सापडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी सीटूने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. नुकतेच डाव्या पक्षांनी केंद्राच्या विरोधात गेल्या २ सप्टेंबर रोजी आंदोलन छेडले होते. हेच आंदोलन आता अधिक व्यापक केले जाणार आहे. केंद्र सरकार आंदोलन करू नका, असे आवाहन करीत असून, दुसरीकडे मात्र कामगार विरोधी निर्णय घेत आहेत. सरकारच्या या धोरणाविरोधात जनआंदोलन छेडणार असल्याचेही मजुमदार म्हणाले. दरम्यान, या पुढील काळात सरकारच्या विरोधात मजूर संघ आमच्याबरोबर असल्याचा दावा मजुमदार यांनी केला. याप्रसंगी श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)