शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मोदींना देशापेक्षा माझ्या कुटुंबाची चिंता - पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:23 IST

नाशिकमध्ये सभा : केंद्र सरकारवर टीका

नाशिक : प्रचारातील तीन सभांमध्ये माझ्यावर टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या सभेत मात्र शरद पवार तिकडे कसे, ते इकडे पाहिजे होते, असे म्हणाले. त्यामुळे ते माझे विरोधक आहेत की हितचिंतक हेच कळत नाही, असा टोला लगावून शरद पवार यांनी, शेती व शेतकरी उद््ध्वस्त होत असताना मोदींना देशापुढील प्रश्नांपेक्षा माझ्या कुटुंबाची चिंंता वाटते, त्यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये, त्यापेक्षा देशाची काळजी करावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सिद्ध प्रिंपी येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात लहान विचारांचे लोक सत्तेवर आल्याने त्याची किंमत आज देशातील प्रत्येक समाजघटक मोजत आहे. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्नांविषयी सरकारला आस्था नाही, त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त होत आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे आमिष दाखविणाºया सरकारने धान्याच्या हमीभावात सरासरी २० ते ३५ टक्के वाढ केली. मात्र मनमोहन सिंग यांच्या काळात सरकारने शेतकºयांच्या हमीभावात शंभर टक्के वाढ केली, त्याचबरोबर शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी लागू करून शेतकºयांचा सातबारा कोरा केला होता. आज नेमकी याउलट परिस्थिती आहे. शेतकºयांच्या शेतमालाला भाव नाही, उत्पादनाचा खर्चही निघत नाही. शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी चुकून संधी दिलेल्या सरकारचा सर्वांनीच अनुभव घेतला आहे.पवार यांनी जागवल्या ‘पुलोद’च्या आठवणी१९८५ मध्ये शरद पवार यांनी पुलोद आघाडी स्थापन करून निवडणूक लढविली त्या वेळी जिल्ह्यातून पुलोदचे १४ आमदार निवडून आले होते. त्याची आठवण पवार यांनी सभेत करून दिली. ते म्हणाले, शेतकरी, कष्टकºयांना न्याय देण्यासाठी तेव्हा पुलोद आघाडी स्थापन करण्यात आली.शेतीच्या प्रश्नावर जिल्ह्याने कायमच एकजूट दाखविली. शरद जोशी व अन्य नेत्यांनी शेतकºयांमध्ये जागृती निर्माण केली. त्यातूनच पुलोदचे सर्व उमेदवार नाशिक जिल्ह्यातून निवडून आले. आम्ही सत्ता स्थापन करू शकलो, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnashik-pcनाशिक