शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आधुनिक वाहनतळाची योजना

By admin | Updated: June 30, 2017 00:56 IST

आधुनिक ‘पे अ‍ॅण्ड पार्क’साठी ४० ठिकाणी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेमार्फत शहरात इंटिग्रेटेड पार्किंग सिस्टम राबविण्यात येणार असून, त्याची सुरुवात म्हणून आधुनिक ‘पे अ‍ॅण्ड पार्क’साठी ४० ठिकाणी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.स्थायी समितीच्या बैठकीत जादा विषयात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’साठी पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी, शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले, शहरात महापालिकेमार्फत इंटिग्रेटेड पार्किंग सिस्टम राबविण्यात येणार आहे. आधुनिक पद्धतीने वाहनतळ उभारण्याची योजना असून, त्याचा आराखडा तयार आहे. त्यात ३४ ठिकाणी रस्त्यांलगत तर ६ ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहनतळ साकारण्याचे नियोजन आहे. सदर पार्किंग व्यवस्थेचे नियंत्रण एकाच एजन्सीमार्फत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागनिहाय मोबाइल अ‍ॅपद्वारे वाहनतळाचे नियंत्रण केले जाणार आहे. कॅशलेस पेमेंटची व्यवस्था असणार आहे. सदर आधुनिक वाहनतळाची योजना करताना महापालिकेला अगोदर त्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी सभापतींनी शहराचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने प्रस्तावाला मान्यता दिली. बैठकीत चार प्रभाग सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृहनेता यांच्यासह विधी, आरोग्य व शहर सुधार समिती यांचे सभापती यांच्याकरिता वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सभापतींनी मंजुरी दिली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स उपस्थित राहत नसल्याबद्दल सभापतींनी गंभीर दखल घेत वैद्यकीय विभागाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले शिवाय, मनपा सेवेत असूनही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईचे संकेत दिले.