नाशिक : शहरातील जमीनींच्या बाजारमुल्यात दहा ते १५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. यापुर्वीच्या तुलनेत दर कमी असले तरी सध्या बांधकाम व्यवसायासमोरिल अडचणी लक्षात घेता ते जादाच असल्याचे व्यावसायीकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षापासून सरकार १ एप्रिल पासून सरकारी बाजारमुल्याचे दर घोषित करते. यंदा ते निश्चित झाले असले तरी शनिवारी अधिकृत दर स्पष्ट होणार आहे. तसेच घरासंदर्भातील तळटिपा शनिवारी दुपारी जाहिर करण्यात येणार आहे. सुत्रानुसार शहरात ७ ते १० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. तर आडगाव सारख्या ग्रामीण व विकास क्षमता असलेल्या क्षेत्रात १२ ते १४ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासनू शहराचा बांधकाम व्यवसाय विविध कारणांनी अडचणीत आला आहे. त्यामुळे ही दरवाढ अधिक असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात क्रेडाईचे माजी अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी सांगितले, व्यवसाय अडचणीत असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात मुंद्राक शुल्क घटले आहे. त्यामुळे अल्प दरवाढ अपेक्षित होती. मात्र दर जास्त असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये रेडीरेकनर दरात माफक वाढ
By admin | Updated: April 1, 2017 02:08 IST