शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नववसाहत भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:21 IST

नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : मनपाकडून जनावर मालकांवर कारवाईची मागणी

मालेगाव : नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सकाळपासून ही मोकाट जनावरे रस्त्यावर, नगर, कॉलन्यांमध्ये मोकाट फिरत असतात. जनावरांचे मालक दिवसभर या जनावरांना मोकाट सोडून देतात व सायंकाळी ही जनावरे बरोबर घरी जात असतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदर जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांकडून हल्ला होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्यावर ही मोकाट जनावरे दिवसभर मध्यभागी बसून असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरातील सोयगाव, कॅम्प, सोमवार बाजार, सोयगाव बाजार, नववसाहत आदी भागात मोकाट जनावरांचे प्रमाण अधिक आहे. या भागातही मोकाट जनावरांकडून अनेक वेळा हल्ले झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्तकरावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.प्लॅस्टिक कचरा जनावरांच्या जिवावरपानांच्या पत्रावळीची जागा आता प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण व ग्लासने घेतली आहे, मात्र चकाचक दिसणारी पत्रावळीचे लवकर विघटन होत नसल्याने या पत्रावळीमुळे मोकाट जनावरे व पर्यावरणावर यांच्यावर विपरित परिणाम होत आहे. अन्न चिकटलेल्या पत्रावळ्या, कचरा कुंड्यांमध्ये साचलेले प्लॅस्टिकचा कचरा मोकाट जनावरांच्या जिवावर उठला आहे. प्लॅस्टिकबंदी होऊनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी मनपाकडून केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच मात्र या जनावरांचे मालक सकाळी दुभत्या जनावरांचे दूध काढून त्यांची वासरे घरी ठेवतात व गायींना दिवसभर शहरात मोकाट फिरण्यासाठी सोडून देतात. महापालिका प्रशासनाने अशा मालकांवर कारवाई करावी, नाहीतर मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे बनवावेत.- अ‍ॅड. आर. के. बच्छाव, अध्यक्ष, मालेगाव वकील संघ.मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी व वृद्ध नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रस्त्यावर जनावरांच्या झुंडीच्या झुंडी ठिय्या देऊन बसलेले असतात. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात. जनावरांची झुंज होत असते. या झुंजींमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नववसाहतीत मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. मनपाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.- प्रदीप पगार, रहिवासी.

टॅग्स :GovernmentसरकारAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार