शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

‘सिम्बॉयसिस’चा आगळा ‘मोबाइल टॉयलेट’ प्रकल्प

By admin | Updated: September 15, 2015 22:21 IST

हरित कुंभ : डोंगरे वसतिगृहावर भाविकांची सोय

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यातील एक आगळावेगळा प्रकल्प नाशिकमधील सिम्बॉयसिस महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी डोंगरे वसतिगृहावर राबविलेला मोबाइल टॉयलेटचा उपक्रम होय. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्वच्छतागृहातील टँकमध्ये सोडलेले जीवाणू हे मैल्याचे रूपांतर पाण्यात व बॉयोगॅसमध्ये करतात.यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा. डॉ. वंदना सोनवणे यांनी सांगितले की, दुसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी डोंगरे वसतिगृहावर वाहनतळ असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होती. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी सिम्बॉयसिस कॉलेजच्या वतीने शुद्धी प्रोजेक्ट टीममार्फत मोबाइल टॉयलेट उभारून स्वच्छ भारत अभियान व हरितकुंभ चळवळ राबविण्यात आली. महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या कुंभथॉन स्पर्धेअंतर्गत प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डीआरडीइच्या सहकार्याने ही स्वच्छतागृहे तयार केली आहेत. दोन भागात विभागलेली ही स्वच्छतागृहे ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनांच्या मदतीने कोठेही घेऊन जाता येतात. एका स्वच्छतागृहात दोन्ही बाजूने पाच-पाच स्वच्छतागृहे असून, बायो डिजिस्टर टँक आणि बायो डिजिस्ट टॉयलेट अशा दोन भागात असलेल्या या प्रसाधनगृहात खालील बाजूच्या टाकीत जमा झालेल्या मैल्याचे टँकमधील जीवाणू पाण्यात व बायोगॅसमध्ये रूपांतर करतात. सदर प्रसाधनगृहे उभारण्यासाठी अनेक खासगी कंपन्यांनी सहकार्य केले. हरित कुंभ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाला जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे तसेच मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी आदिंनी भेट देऊन सूचना केल्या, असेही सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)