शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात मोबाइलचा सिलसिला सुरुच

By admin | Updated: December 25, 2016 01:59 IST

पुन्हा आढळले पाच मोबाइल : गुन्हा दाखल, कारागृहाच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे व बेवारसरीत्या वर्षभरात सापडलेल्या मोबाइलच्या संख्येने ‘अर्धशतक’ गाठले आहे. कारागृहात शुक्रवारी पुन्हा पाच बेवारस मोबाइल आढळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिकरोडला मध्यवर्ती कारागृहातील बिघडलेली शिस्त, सुरक्षितता यामुळे कारागृह प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. कारागृहात होणारा मोबाइलचा सर्रास वापर हे काही विशेष राहिलेले नाही. कारागृहातील अनागोंदी व गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह निरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठ तुरुंग अधिकारी कैलास भवर, गणेश मानकर, सुनीलकुमार कुंवर यांना चौकशीअंती निलंबित केले. यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, गेल्या महिन्याभरात कारागृहात जवळपास ४० मोबाइल सापडले आहेत. कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मंडल क्रमांक ७ सर्कल ६ची झडती घेतली असता शौचालयाच्या भांड्यात व खोली क्रमांक १४६च्या पाठीमागील खिडकीच्या फटीत ५ मोबाइल बेवारसरीत्या आढळून आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहातील अनागोंदी, गैरप्रकार, बिघडलेली शिस्त व सुरक्षितेच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वीच कारागृहातील ११ कैद्यांना इतर कारागृहात हलविण्यात आले. तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे कारागृहातील अधिकारी - कर्मचारी कुठलीही गोष्ट अंगावर घेण्यास तयार नसल्याने कारागृहात सापडत असलेले मोबाइल कायदेशीररीत्या कागदावर येत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)