शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भेटवस्तूंच्या यादीत मोबाइलला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:58 IST

आनंदोत्सवाचा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीला आतापासूनच सुरुवात झाली असून, यावर्षी अनेक भावा-बहिणींना तसेच आई-वडील मुलांना दसरा व दिवाळी भेट म्हणून मोबाइल देण्याचे नियोजन करीत असून, भेटवस्तुंच्या यादीत ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला अधिक पसंती मिळत आहे. भेटवस्तू वेळेवर मिळावी यासाठी अनेकांनी आतापासूनच इंटरनेट व दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन मोबाइलचा तुलनात्मक शोध घेऊन बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : आनंदोत्सवाचा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीला आतापासूनच सुरुवात झाली असून, यावर्षी अनेक भावा-बहिणींना तसेच आई-वडील मुलांना दसरा व दिवाळी भेट म्हणून मोबाइल देण्याचे नियोजन करीत असून, भेटवस्तुंच्या यादीत ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला अधिक पसंती मिळत आहे. भेटवस्तू वेळेवर मिळावी यासाठी अनेकांनी आतापासूनच इंटरनेट व दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन मोबाइलचा तुलनात्मक शोध घेऊन बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.  भाऊ व बहिणीला दसरा, दिवाळी भेट देताना नियोजित वेळ चुकू नये व त्याला किंवा तिला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी यावर्षी अ‍ॅँड्रॉइड मोबाइल भेटवस्तू म्हणून देण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. एकीकडे तरुणाईचा अत्याधुनिक मोबाइलकडे कल वाढलेला असताना विविध मोबाइल कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदराने मोबाइलसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे महागात महाग मोबाइल खरेदी करणे अगदी सोपे झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ४ ते ६ जीबी रॅम आणि ३२ व ६४ जीबीची रोम असलेल्या मोबाइलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भेटवस्तू म्हणून मोबाइल देताना तो फूल एचडी असावा व त्याचा प्रोसेसरही उत्तम परफॉर्म करणारा असावा याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. सर्वसाधारण वापरात असलेले, परंतु अ‍ॅँड्रॉइड फोनची क्रेझ असलेले ग्राहक १.५ ते ३ जीबी रॅम आणि एचडी डिस्प्लेच्या फोनला पसंती देत आहेत.नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच विविध मोबाइल कंपन्यांनी दसरा-दिवाळीच्या सवलती जाहीर केल्याने विक्रीत वाढ झाली आहे. १० ते १५ हजार रुपयांपर्यंतचे मोबाइल भेटवस्तू देण्यासाठी आणि स्वत:साठीही वापरता येत असल्याने या सेगमेंटला अधिक मागणी आहे.  - चेतन वाणी, संचालक,सध्या बाजारात सॅमसंग, अ‍ॅपल, व्हीओ, अप्पोसारख्या विविध कंपन्यांच्या मोबाइलची ग्राहकांकडून चांगली चौकशी होत आहे. एका कुटुंबात जवळपास तीन-तीन चार मोबाइल खरेदी होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या अन्य वस्तुंपेक्षा मोबाइलची मागणी ३० ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. - जितेंद्र बेलगावकर, संचालक, जितेंद्र वर्ल्डमोबाइलची आॅनलाइन खरेदी वाढल्यामुळे व्यवसाय प्रभावित झाला आहे. परंतु, दुकानात विक्रेता मोबाइलचा डेमो देतो. तसेच विक्र ीनंतरही सेवा देतो. तसेच कंपन्यांचे शून्य टक्के व्याजदराने अर्थसाहाय्यही उपलब्ध असल्याने सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला मागणी वाढली आहे. - मुकेश मुंदडा, संचालक, मुंदडा इलेक्ट्रॉनिक्स