विनायक उत्तम गायकवाड (२५, रा. विनयनगर) यांच्या फिर्यादीनुसार ते रविवारी (दि.८) रात्री सव्वा आठच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५ एचके ६५४८) मित्र विशाल गाडेकर व चिन्मय पाटील यांच्यासोबत जात होते. त्यावेळी कुरापत काढून संशयित हर्षद सुनील पाटणकर (२२), गोपाल राजेंद्र नागोलकर (२१), मयूर दिनेश जाधव (२३, तिघे रा. शरणपूररोड) व त्यांचा साथीदार हेमंत प्रकाश महाले (२२, रा. सिडको) यांनी त्यांच्या ताब्यातील मोटारीने दुचाकीला धक्का देत तिघांना खाली पाडले. त्यानंतर हातात धारदार शस्त्र घेऊन विनायक यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करत कार पुन्हा माघारी आणून तिघांच्या अंगावर घातली. यात विशालच्या दोन्ही पायास तर चिन्मयच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST