शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची ट्वेंटी-ट्वेंटी; शहरात अचानक येणार ‘नवनिर्माणा’ला भरते!

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

नाशिक : दोन वर्षांत जे झाले नाही ते अवघ्या सहा महिन्यांत करण्याच्या तयारीला मनसे लागली असून, त्याची सूत्रे आता थेट राज ठाकरे यांनीच हाती घेतल्याचे दिसत आहे.

नाशिक : दोन वर्षांत जे झाले नाही ते अवघ्या सहा महिन्यांत करण्याच्या तयारीला मनसे लागली असून, त्याची सूत्रे आता थेट राज ठाकरे यांनीच हाती घेतल्याचे दिसत आहे. आठवडाभराच्या अंतरात ठाकरे दुसऱ्यांदा नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, दुपारी कल्पक प्रकल्पांची आखणी करण्यासाठी प्रायोजकांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.गेल्या आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी सध्या मनसेची सायलेंट मुव्ही सुरू असल्याचे वक्तव्य केले होेते. त्यानंतर येत्या सहा महिन्यांत शहरात मोठे बदल झाल्याचे दिसेल, असे स्पष्ट केले होते. त्याची तयारी सध्या सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर राज यांचा अवघा आठवडाभरातील हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मनसेच्या काळात राज ठाकरे यांनी प्रायोजकांना गळ घालून गोदापार्कचे नूतनीकरण आणि त्यावरच मनोरंजन पार्कसारखे प्रकल्प उभारण्यास रिलायन्स फाउंडेशनला राजी केले. सादरीकरण आणि भूमिपूजनात प्रचंड वेळ गेलाच; परंतु त्यानंतरही हा प्रकल्प रखडला होता. पालिकेत मनसेची सत्ता असतानादेखील रिलायन्सला अनेक अडथळे पार पाडावे लागले आणि राज ठाकरे यांनी लक्ष घातल्यानंतर हा विषय मार्गी लागला. रिलायन्सने या कामासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली असून, दोन दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्याची पाहणी राज या दौऱ्यात करण्याची शक्यता आहे. याशिवाय पेलिकन पार्कसह अन्य प्रकल्पांना भेटीसाठी नियोजन सुरू आहे.गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान राज हे मुंबईहून नाशिकला शासकीय विश्रामगृहावर पोहोचतील. त्यानंतर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा तसेच पालिकेतील विविध प्रकल्पांविषयी प्रायोजकांशी चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक मुक्कामी असलेले राज शुक्रवारी मुंबईस परतणार आहेत. (प्रतिनिधी)