शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: September 18, 2016 00:18 IST

हालचाली : पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक सेना-भाजपाच्या वाटेवर

नाशिक : आतापर्यंत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोळा नगरसेवकांनी सेना-भाजपाला आपलेसे केले असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असून, काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याने पक्षाच्या भवितव्याचा अंदाज बांधत काही नगरसेवकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी सेना-भाजपात प्रवेश करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षभरात महापालिकेतील सत्ताधारी मनसेला पक्षांतराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. मनसेचे माजी महापौर यतिन वाघ यांच्यासह नगरसेवक सुरेखा नागरे, अरविंद शेळके, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धोंगडे, रत्नमाला राणे, उषा शेळके, लता टिळे आणि मीना माळोदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.तर डॉ. दीपाली कुलकर्णी, वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, माधुरी जाधव, अर्चना थोरात यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. नाशिकरोड येथील नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून मतदान केल्याने त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले. त्यानंतर दोन्ही रिक्त जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार असून त्याचवेळी प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत सेना-भाजपाने घेतलेली मते पाहता सत्ताधारी मनसेच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी मनसेत मोठी फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामध्ये काही पक्षपदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. सेना-भाजपाचे पदाधिकारी मनसेच्या काही नगरसेवकांच्या संपर्कात असून, नवरात्रोत्सवात प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचे सीमोल्लंघन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.