शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मनसेत संघटनात्मक फेरबदलाचे संकेत

By admin | Updated: April 25, 2017 02:32 IST

नाशिक : ‘आता पुन्हा पराभव पाहायचा नाही’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेत फेरबदलाचे संकेत मिळत आहे

 नाशिक : ‘आता पुन्हा पराभव पाहायचा नाही’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेत संघटनात्मक फेरबदलाचे संकेत मिळत असून, पक्षापासून दुरावलेल्यांना पुन्हा परतण्याची साद घालण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार, काही पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याची चिन्हे असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेना-भाजपात जाऊनही पराभवाचा सामना करावा लागलेले काही पराभूत नगरसेवकही मनसेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचा सर्वाधिक तडाखा राज ठाकरे यांच्या मनसेला बसला होता. मनसेच्या ४० पैकी ३० नगरसेवकांनी सोईनुसार सेना-भाजपा तसेच कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यात भाजपाकडून रुची कुंभारकर, शशिकांत जाधव, अर्चना थोरात, संगीता गायकवाड, डॉ. दीपाली कुलकर्णी व सतीश सोनवणे, तर सेनेकडून रमेश धोंगडे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयमाला पडली. यशवंत निकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी रूपाली निकुळे या भाजपाकडून निवडून आल्या. मात्र, गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, माधुरी जाधव, माजी महापौर यतिन वाघ, गुलजार कोकणी, विजय ओहोळ, अशोक सातभाई, शीतल भामरे व जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या वाट्याला पराभव आला होता. वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, हरिष लोणारी व रेखा बेंडकुळे यांना तर पक्षांतर करूनही तिकीट नाकारण्यात आले होते. महापालिका निवडणुकीत शिल्लक दहा पैकी आठ नगरसेवकांनी मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यातील माजी महापौरांसह तिघा नगरसेवकांनाच पुन्हा विजय संपादन करता आला तर अन्य दोन नवखे सदस्य निवडून आले. आता महापालिका निवडणूक आटोपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून पक्षस्तरावर महापालिकेतील पराभवाचे चिंतन केले जात आहे. त्यातच राज ठाकरे यांनी संघटनात्मक फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, सध्या प्रदेश उपाध्यक्षपद भूषवित असलेल्या राहुल ढिकले यांच्याकडील शहराध्यक्षपद माजी आमदार नितीन भोसले यांच्याकडे पुनश्च दिले जाण्याची शक्यता असून पक्षापासून दुरावलेले माजी प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांनाही पक्षात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.