शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले

By admin | Updated: November 8, 2014 00:57 IST

मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले

नाशिक : मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी बनविलेल्या पत्रिकेतून मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले असून, दुसरीकडे राजीनामा दिलेल्या जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरेंना मात्र सन्मानाने आमंत्रित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे महापालिकेत प्रतिनिधित्व करता करताच विधानसभेत पोहोचलेल्या तिघा नवनिर्वाचित आमदारांना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊनसुद्धा त्यांनी या कार्यक्रमाकडे फिरविलेली पाठ हा चर्चेचा विषय झाला होता. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही मनसेचे नेते असणारे वसंत गिते यांचे नाव आमंत्रण पत्रिकेत नसल्याने त्यांना आमंत्रण दिले की नाही याबद्दलही चर्चा सुरू होती. माजी आमदार आणि मनसेचे शहरातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना आमंत्रण देणे आणि त्यांची उपस्थिती असणे गरजेचे होते; परंतु तसे दिसले नाही. मनपाच्या लोकप्रतिनिधींनी भुजबळांशी घेतलेल्या भेटीप्रसंगीही गिते उपस्थित नव्हते. गिते यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि आता त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही असे गृहीत धरले तरी राजकीय पक्षांच्या अधिकाऱ्यांची नावे असलेल्या निमंत्रण पत्रिकेत राजीनामा दिलेल्या सचिन ठाकरेंचेही नाव आहे. त्यामुळे गितेंची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. सध्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधीची भासणारी चणचण सर्वश्रुत असताना, आणि नगरसेवकांपासून ते महापौरांपर्यंत सर्वच जण त्याची ओरड करीत असताना, सत्ताधारी पक्षाच्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून नवनिर्वाचित आमदार उपस्थित राहून काहीतरी आश्वासन देतील अशी अपेक्षा होती. पालिकेच्या वर्धापनदिनाच्या पत्रिकेत या सर्वच आमदारांची नावे सन्माननीय उपस्थित म्हणून टाकण्यात आली होती; परंतु एक दिवसाआधीच महापौरांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंहस्थ निधीसाठी भुजबळांची भेट घेतल्याने सत्ताधारी असूनही आपल्याला डावलल्याची खंत भाजपा आमदारांना वाटत असल्यानेच त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. एकूणच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावरही गटबाजीचेच सावट दिसून आले.