लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे व राजू शेट्टी या दोघा मातब्बर नेत्यांच्या दोनदा दीर्घ बैठका झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीखेरीजचा वेगळा पर्याय मतदारांपुढे येतो की काय, याची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक बनले आहे. तसे झाले, म्हणजे ‘मनसे’ व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली तर नाशिक जिल्ह्यातही काही जागांवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येऊ नये.लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, देशाची व राज्याची गणिते वेगवेगळी असतात म्हणून सारेच विरोधक पुन्हा नव्या जोमाने विधानसभेसाठीच्या तयारीला लागले आहेत. यात भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वांनाच एकत्र घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत खरे; परंतु वंचित आघाडीसारख्या पक्षांनी अवाजवी जागा मागितल्याचे पाहता त्यांची वाटचाल स्वतंत्रच राहण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतही जागा वाटपाचा तिढा नाही असे नाही, शिवाय मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यायच्या हा कळीचाच मुद्दा ठरूशकणारा आहे. पराभवाची खात्री असली तरी लढून पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठी असल्याने अन्यसमविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...
By किरण अग्रवाल | Updated: July 10, 2019 09:35 IST
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न चालविले असले तरी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडे अडू शकते. अशात, ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’ने पर्यायालाही वेगळा पर्याय उभा केला तर स्वकीयांना अधिक संधी लाभेलच, शिवाय मतविभागणीवर नजर ठेवून आडाखे बांधणाऱ्यांनाही नवीन उंबरठा लाभू शकेल.
‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...
ठळक मुद्देकाँग्रेस आघाडीत सन्मानजनक जागावाटप न झाल्यास विरोधकांमध्ये नवा पर्याय आकारास येण्याची चिन्हेलोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाºया ठरूशकतात.समविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.