शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

महापौरांच्या प्रभागात मनसेला धोबीपछाड लोकसभा निवडणूक : सेना उमेदवाराचे वर्चस्व

By admin | Updated: May 21, 2014 23:58 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात चारीमुंड्या चीत झालेल्या मनसेची वाताहत महापौर ॲड. यतिन वाघ यांना आपल्या प्रभागातही रोखता आलेली नाही. महापौरांच्या प्रभागात मतदारांनी मनसेला धोबीपछाड देत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात चारीमुंड्या चीत झालेल्या मनसेची वाताहत महापौर ॲड. यतिन वाघ यांना आपल्या प्रभागातही रोखता आलेली नाही. महापौरांच्या प्रभागात मतदारांनी मनसेला धोबीपछाड देत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले. सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी करताना हेमंत गोडसे यांचा अवघ्या २२ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. यंदाही मनसेने नाशिक मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यानुसार निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरच राज ठाकरे यांनी डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी करण्याचे निर्देश देत नवा उच्चविभूषित चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न दाखविला होता. पवार यांनीही जोमाने कामाला लागत वातावरण निर्मिती केली होती. मतदानाच्या अगोदर काही दिवसांपर्यंत पवार चर्चेत होते. परंतु मतदानाच्या दिवशी खरा सामना शिवसेनेचे हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यातच पाहावयास मिळाला. लोकसभा निवडणुकीत मनसे तिसर्‍या स्थानावर फेकली गेली, शिवाय उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली. मनसेच्या उमेदवाराला केवळ ६३,०५० मतांवर समाधान मानावे लागले. सहाही विधानसभा मतदारसंघात मनसेला पिछाडीला सामोरे जावे लागले. सर्वत्र मनसेने मार खाल्ला असताना महापौरांच्या प्रभागातही मनसेची बिकट अवस्था बघायला मिळाली. आता मतदानकेंद्रनिहाय जाहीर होत असलेल्या आकडेवारीनुसार महापौरांच्या प्रभागातील पेठे विद्यालयातील केंद्रात हेमंत गोडसे यांना २०९५, छगन भुजबळ यांना ९७० मते मिळाली. मात्र, मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांना अवघी ३६३ मते मिळाली. गोरेराम लेनमधील केंद्रातही गोडसे यांना १००६, भुजबळांना २६६ तर मनसेचे प्रदीप पवार यांना अवघी ६७ मते पदरात पाडून घेता आली. विवेकानंद विद्यालयातील केंद्रातही गोडसे यांना ८६१, भुजबळ यांना ३६७ तर पवार यांना १४६ मते मिळाली. मनसेच्या महापौरांच्या प्रभागातच मनसेची झालेली वाताहत ॲड. यतिन वाघ यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. महापौर विरोधकांची पूर्वतयारीगेल्या दोन टर्मपासून रविवार पेठ परिसरातून निवडून गेलेल्या ॲड. यतिन वाघ यांना महापालिकेची पुढची निवडणूक अवघड असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे. मनसेच्या हाती महापालिकेची सत्ता देऊनही शहराचा कायापालट न झाल्याची भावना मतदारांमध्ये उफाळून आली असून, त्याचा राग त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया मनसेविरोधकांकडून व्यक्त होत आहे. महापौरांना शह देण्यासाठी आतापासूनच काही इच्छुकांनी पूर्वतयारीस प्रारंभ केला आहे.