शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनसे भाजपासोबत; विरोधकांना झटका

By admin | Updated: May 20, 2017 02:22 IST

नाशिक : तौलनिक संख्याबळाच्या आधारे विरोधकांकडून स्थायी समितीसह अन्य विविध विषय समित्यांमध्ये भाजपाची कोंडी करण्याचा डाव आखला गेला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तौलनिक संख्याबळाच्या आधारे विरोधकांकडून स्थायी समितीसह अन्य विविध विषय समित्यांमध्ये भाजपाची कोंडी करण्याचा डाव आखला गेला असतानाच मनसेने प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेसह विरोधकांना मोठा झटका बसला आहे. मनसेच्या या निर्णयामुळे विरोधकांचे संख्याबळ आता ५६ वरून ५५ वर आले असून, शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही निरर्थक ठरणार आहे.महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ६६ जागांवर विजय संपादन करत बहुमत मिळविले. त्याखालोखाल शिवसेना - ३५, कॉँग्रेस - ६, राष्ट्रवादी - ६, मनसे - ५, अपक्ष - ३ आणि रिपाइं - १ असे बलाबल राहिले. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने स्थायी समितीसह महिला बालकल्याण, शिक्षण समिती तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या विधी, आरोग्य व शहर सुधार समित्याही भाजपाच्याच ताब्यात राहणार होत्या. परंतु, विरोधकांनी एकत्र येत भाजपाला समित्यांवर सहजासहजी ताबा मिळवू द्यायचा नाही, अशी व्यूहरचना आखली आणि विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीची खेळी खेळली गेली. कॉँग्रेससोबत अपक्ष विमल पाटील, राष्ट्रवादीसोबत अपक्ष गुरुमित बग्गा, तर मनसेसोबत अपक्ष मुशीर सय्यद यांची गटनोंदणी केली गेली, तर शिवसेनेने रिपाइंसोबत एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला. ाागील पंचवार्षिक काळात मनसेसोबत पहिली अडीच वर्षे भाजपाने संसार केला होता. त्यात भाजपाला उपमहापौरपदासह अन्य समित्यांवरही संधी मिळाली होती. मनसेला केलेल्या उपकाराची परतफेड प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केल्याचे मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले असले तरी मनसेला जाळ्यात ओढत भाजपाने विरोधकांवर मात करण्याची ही मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. भाजपाने महापौर-उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षांचा कालावधी पक्षस्तरावर निश्चित केला आहे.  मनसेला सव्वा वर्षांसाठी उपमहापौरपदाचे गाजर दाखविले गेल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय, अन्य समित्यांवरही मनसेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण समिती तसेच विषय समित्यांवर तौलनिक संख्याबळानुसार मनसेचा एकही सदस्य जाऊ शकणार नाही, परंतु भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाच्या कोट्यातून मनसेच्या पाच सदस्यांसह सहयोगी अपक्षाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.