नाशिक : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या गावनिहाय तयार करण्यात येणाऱ्या वार्षिक आराखड्याबाबतचे प्रशिक्षण आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पार पडले़ नागपूर येथे याबाबतचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्'ातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले़ राज्यातील ३५१ पैकी १६७ पंचायत समित्यांमध्ये गावनिहाय ग्रामस्थांच्या सहभागातून मंजूर अंदाजपत्रक व वार्षिक आराखडा तयार करण्यात येणार आहे़ याचाच एक भाग म्हणून आजचे जिल्'ास्तरीय प्रशिक्षण पार पडले़ या प्रशिक्षणातील सहभागी अधिकारी तालुकास्तरावर ग्रामसेवक तसेच इतर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत़ यानंतर जिल्'ातील ग्रामपंचायतींचा २०१५चा वार्षिक आराखडा तयार करण्याच्या कामांना सुरुवात होणार आहे़
जिल्हा परिषदेत मनरेगा वार्षिक आराखडा प्रशिक्षण
By admin | Updated: December 4, 2014 23:51 IST