शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सफाई कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून

By admin | Updated: June 1, 2017 02:06 IST

शस्त्राने वार करून खून केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून त्यानंतर रामवाडी गोदावरी नदीपात्रात फेकण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्याच्या पाठीवर, पोटावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून त्यानंतर रामवाडी परिसरातील गोदावरी नदीपात्रात फेकण्यात आल्याचा प्रकार बुधवारी (दि़३१) दुपारी उघडकीस आला़ खून करण्यात आलेल्या महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचे नाव अरुण बर्वे (३८, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे आहे़रामवाडी परिसरात कोशिरे मळा असून या मळ्यासमोरच गोदावरी नदीपात्र आहे. बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास परिसरातील काही नागरिक नदीपात्रालगत उभे असताना एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला़ त्यांनी ही बाब पंचवटी पोलिसांना कळविली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांना मृतदेहाच्या पाठीवर, पोटावर तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे आढळून आले़ मृतदेहाच्या एका हातावर अरुण हे नाव तर दुसऱ्या हातावर शिवाजी महाराजांचे चित्र गोंदलेले होते़ या इसमाच्या अंगात बनियन, काळ्या रंगाची पँट व पायात मोजे असल्याने सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविणे अवघड झाले होते़ पोलिसांनी परिसरातील नागरिकांना बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता मखमलाबाद रोडवरील उदय कॉलनीतील बच्छाव हॉस्पिटलच्या मागे राहणारा सफाई कर्मचारी अरुण बर्वे याचा मृतदेह असल्याचे समोर आले़