शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदारांना ‘नो एण्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:27 IST

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीत आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय गटनेत्यांना स्थान देणारा महासभेचा ठराव शासन निर्णयात अभिप्रेत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेचे आयुक्त तथा कंपनीचे संचालक अभिषेक कृष्ण यांनी उतरत्या क्रमानुसार कॉँग्रेस व राष्टÑवादीचे प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यासाठी महापौरांना अवगत करून देण्याचे निर्देश नगरसचिवांना दिले आहेत. त्यामुळे, सत्ताधारी भाजपाचा प्रस्ताव एकप्रकारे फेटाळून लावण्यात आला असून, कंपनीत आमदार-खासदारांना एण्ट्री राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीत आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय गटनेत्यांना स्थान देणारा महासभेचा ठराव शासन निर्णयात अभिप्रेत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेचे आयुक्त तथा कंपनीचे संचालक अभिषेक कृष्ण यांनी उतरत्या क्रमानुसार कॉँग्रेस व राष्टÑवादीचे प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यासाठी महापौरांना अवगत करून देण्याचे निर्देश नगरसचिवांना दिले आहेत. त्यामुळे, सत्ताधारी भाजपाचा प्रस्ताव एकप्रकारे फेटाळून लावण्यात आला असून, कंपनीत आमदार-खासदारांना एण्ट्री राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.स्मार्ट सिटी अभियानांतर्गत एसपीव्हीची स्थापना करण्यात आली आहे. कंपनी कायद्यानुसार नोंदणीही करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार कंपनीच्या संचालकपदी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील व विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच व्यापक राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना कंपनीवर प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. याकरिता नियुक्त केलेले चार पदनिर्देशित संचालक ज्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करत असतील, असे राजकीय पक्ष वगळून अन्य राष्ट्रीय-राज्य मान्यताप्राप्त दोन राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे महासभेकडून दोन संचालक नामनिर्देशित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, कॉँग्रेसने गटनेता शाहू खैरे तर राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून अपक्ष गुरुमित बग्गा यांची नावे सुचविली होती. परंतु, महासभेने ठराव करत कंपनीवर आमदार, खासदार यांच्यासह सर्वपक्षीय गटनेत्यांनाही स्थान मिळावे, अशी शासनाकडे मागणी केली होती. परंतु, आयुक्तांनी सदरचा ठराव शासन निर्णयात अभिप्रेत नसल्याचे सांगत तरतुदीनुसार कॉँग्रेस व राष्टÑवादीचा प्रतिनिधी नामनिर्देशित करण्याकरिता महापौरांना अवगत करून देण्याचे निर्देश नगरसचिवांना दिले आहेत.