शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात जनता कर्फ्यूबाबत संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे ...

नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. यात भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातच कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्रशासकीय यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बाजारपेठा, भाजीबाजारात खरेदीसाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यात सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून येत्या दोन दिवसात बडी रात असल्याने जनता कर्फ्यूबाबत मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे.

इन्फो

बाजार समितीही बंद

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही जनता कर्फ्यूदरम्यान कांदा, भाजीपाला व भुसार मालाचा लिलाव बंद ठेवल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. नियमबाह्यपणे सलग तीन दिवस बाजार समिती बंद ठेवता येत नसल्याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे हरीभाऊ महाजन यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.

कोट....

मुळात शासन निर्बंध आणि केला जात असलेला जनता कर्फ्यू चुकीचा आहे. शासनाने कुठलाही बंद न ठेवता २४ तास दुकाने सुरू ठेवावी. त्यामुळे एकाच वेळी गर्दी होणार नाही. सध्या विशिष्ट वेळेत दुकाने सुरू राहत असल्याने मोठी गर्दी होऊन कोरोना वाढत आहे. जनता कर्फ्यूमुळे काही साध्य होणार नाही. उलट व्यापारी, जनता व शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होणार आहे.

- अ‍ॅड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला