शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

बदलीसाठी आमदाराची दिशाभूल

By admin | Updated: September 26, 2015 22:21 IST

नाशिक बाजार समिती : लेखापरीक्षक हटविण्यासाठी अट्टहास

नाशिक : बाजार समितीचे लेखापरीक्षण करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराचे वाभाडे काढल्याचा राग मनात धरून विद्यमान पदाधिकाऱ्याने शहरातील एका सत्ताधारी आमदाराची दिशाभूल करून लेखा परीक्षकांच्या बदलीचे प्रयत्न चालविल्याची बाब सहकार क्षेत्रात चर्चेची ठरली आहे. बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांनी सदर आमदाराच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर सहकारमंत्र्यांकडे केली जाणारी लेखा परीक्षकांची तक्रार वाटेतच अडविण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहाराची खुली चर्चा यापूर्वीही लेखा परीक्षणाच्या माध्यमातून उजागर झाली असून, नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही विद्यमान पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे खुले आरोप करण्यात आले. सन २०१३-१४ या कालावधीत बाजार समितीचे गाळे प्रकरण, सहकार बॅँकेचे कर्ज परतफेड या साऱ्या बाबींमध्ये बाजार समिती ६३ कोटी, ५४ लाख, ४७ हजार रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा ठपकाही तत्कालीन सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती दिलीप थेटे, सचिव खकाळे, काळे व लेखापाल जैन यांच्यावर ठेवण्यात आला होता. शासनाने नेमलेले विशेष लेखा परीक्षक पिंगळे व गाधेकर यांनीच हा सारा प्रकार उघडकीस आणल्याचा राग मनात धरून त्यांच्या बदलीसाठी बाजार समितीच्या एका विद्यमान पदाधिकाऱ्याने चार दिवसांपूर्वी शहरातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीकडून सहकार-मंत्र्यांच्या नावे पत्र मागितले, परंतु असे पत्र मागण्यामागचे कारण विषद केले नाही. भाजपाच्या या लोकप्रतिनिधीने विद्यमान पदाधिकाऱ्यावर विश्वास ठेवून कोरे पत्र त्याच्या हाती सोपविल्यानंतर या पत्राच्या आधारे बाजार समितीचा गैरव्यवहार शोधून काढणाऱ्या विशेष लेखा परीक्षकांची बदली करण्याचा डाव या विद्यमान पदाधिकाऱ्याने आखला. परंतु त्याची कुणकुण बाजारसमितीतील काही व्यापारी व सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी भाजप आमदाराच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यानच सहकारमंत्र्यांची भेट घेऊन आमदाराच्या नावे पत्र देण्याचा विद्यमान पदाधिकाऱ्याने ठरविलेले असताना, त्याच वेळी सदर आमदारानेही सहकारमंत्र्यांशी संपर्क साधत त्या पत्राची दखल न घेण्याची विनंती केली. विद्यमान पदाधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या या दिशाभुलीबाबत आमदाराने जाब विचारला असता, त्यावर सारवासारव करण्यात आली; मात्र बाजार समितीच्या आवारात या पत्राचे बिंग फूटून विद्यमान पदाधिकाऱ्याचे हसे झाले. (प्रतिनिधी)