शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गहाळ झालेले ३ लाख ७० हजारांचे दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:49 IST

सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड हे सिन्नर तालुक्यातील ठाणगावचे भूमिपुत्र आहे.

ठळक मुद्देठाणगाव : भूमिपुत्राच्या कामगिरीने ग्रामस्थ आनंदित

सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड हे सिन्नर तालुक्यातील ठाणगावचे भूमिपुत्र आहे.कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंधी बांधवांचे झुलेलाल मंदिर असून मंदिरात लोरी (होळीसारखा) सण साजरा करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास कुलाबा येथील व्यापारी गौतम सिंह मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरासमोर श्रीफळ वाढवून दर्शन घेतल्यानंतर ते घरी परतले. मात्र हातातील मौल्यवान सोन्याचे कडे नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौतम पुन्हा झुलेलाल मंदिरात शोध घेण्यासाठी आले. परंतु सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले होते. कफपरेड पोलीस ठाण्याचे अंमलदार आव्हाड गस्त घालत असताना त्यांच्याकडे गौतम यांनी मदत मागितली असता. प्रवेशद्वार बंद असल्याने आव्हाड यांनी १४ फूट उंच भिंतीवरून चढून सुरक्षारक्षकांना बोलावून शोधकार्य हाती घेतले. पहाटे पावणेदोनच्या सुमारास आव्हाड यांना होळीच्या राखेत सोन्याचे कडे सापडले. पोलीस नाईक आंधळे आणि पोलीस शिपाई महानोर घटनास्थळी दाखल झाले होते. गहाळ झालेले ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कडे परत मिळाल्याने गौतम यांच्या जीवात जीव आला. गौतम यांनी रात्रपाळीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपवते यांना भेटून आव्हाड यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरPolice Stationपोलीस ठाणे