नाशिक : नाशिकच्या शिल्पी अवस्थी यांनी नुकतीच श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेली मिसेस इंडिया इंटरनॅशनल ही सौंदर्य स्पर्धा जिंकली असून, संपूर्ण भारतातून एका प्रक्रि येतून निवड झालेल्या ३० सौंदर्यवतीतून शिल्पी यांनी हा बहुमान मिळवला आहे. शिल्पी अवस्थी या नाशिकमधील व्यावसायिक महिला असून, सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात.सदर स्पर्धा या फक्त सौंदर्य स्पर्धा नसून यात संपूर्ण व्यक्तिमत्त्व कसे आहे याचीही चाचणी करण्यात येते. यामध्ये सामान्यज्ञान, टॅलेंट राउंड, थिम राउंड अशा विविध चाचण्यांतून ही निवड करण्यात आली.
नाशिकच्या अवस्थी ठरल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:28 IST