शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट बाकांच्या खरेदीत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:24 IST

कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा विषय ठरत आहे.

कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा विषय ठरत आहे.कसबे सुकेणे ग्रामपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी गटांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. सरपंच गीता गोतरणे व सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाला असून, सिमेंट बाके खरेदी करताना ती उत्पादकाकडून खरेदी न केल्याने या खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप धनंजय भंडारे, उपसरपंच सविता जाधव, सोमनाथ भागवत, रमेश जाधव, अतुल पाटील, मनीषा भंडारे, सुरेखा औसरकर, आरती कर्डक, सय्यद आबेदा अली यांनी निवेदनाव्दारे केली आहे.आनंदराव भंडारे यांनीही सिमेंट बाक खरेदी गैरव्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपालिकेला ३० बाके भेट दिली. या बाकांवर त्यांचे मूल्य असून, एकूण किंमत २१०० रुपये असल्याचे नमूद करून ग्रामपालिकेने खरेदी केलेले व आनंदराव भंडारे यांनी विनामूल्य दिलेल्या सिमेंटच्या बाकड्यांच्या किमतीत कशी तफावत आहे, हे दर्शवित गैरव्यवहाराच्या विरोधात अभिनव आंदोलन छेडले.यात आनंद भंडारे, सोमनाथ भागवत, सचिन पाटील, किशोर कर्डक, राजू वडघुले, शौकत सय्यद, वृषभ जाधव, विजय चव्हाण आदींचा सहभाग होता. कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सत्ताधारी मनमानी कारभार करत असून, सिमेंट बाक खरेदीत दोन लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. याविरु द्ध आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.- धनंजय भंडारे, सदस्यग्रामपालिकेची सिमेंट बाक खरेदी ही शासनाच्या ई-टेंडर प्रक्रि येतून झाली आहे. विरोधक राजकीय हेतूने आरोप करीत आहे.- छगन जाधव, सत्ताधारी गट