शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

सफाई कामगारांची दिशाभूल करून चित्रीकरण

By admin | Updated: August 1, 2015 00:35 IST

श्रमिक संघाचा मोर्चा : किमान वेतन मिळत असल्याचे घेतले वदवून

नाशिक : केंद्र शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून किमान वेतन वाढविले असताना महापालिका प्रशासनाने त्याबाबत सफाई कामगारांना माहिती न देता सध्या किमान वेतन मिळते काय असा प्रश्न करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले तसेच व्हिडीओ चित्रीकरण करून घेतल्याचा गंभीर आरोप नाशिक महापालिका श्रमिक सेवा संघाने केला आहे. प्रशासनाच्या या कृतीच्या निषेधार्थ शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. तसेच फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासनाकडे असलेली थकबाकीची रक्कम देण्याची मागणी करण्यात आली.नाशिक महापालिकेच्या घंटागाड्यांवर सुमारे सहाशे कामगार काम करतात. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन मिळावे यासाठी पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने त्यांना साडेपाच हजार रुपये दिले असून त्यात टीए, डीए मिळून ही रक्कम अधिक मिळते. दरम्यान असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात केंद्र शासनाने किमान वेतनात वाढ केल्याने सध्या घंटागाडी कामगारांना साडेअकरा हजार रुपये किमान वेतन तर अन्य भत्ते धरून साडे चौदा हजार रुपये देणे अपेक्षित आहे. परंतु ही वाढ प्रशासनाने केली नाहीच उलट बुधवारी पाथर्डी शिवारातील कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या कामगारांना आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी आपल्या केबीनमध्ये बोलावले आणि किमान वेतन मिळते का असे विचारले आणि कामगारांकडून अर्ज भरून घेतले. वास्तविक, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वाढीबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून घेतले. विशेष म्हणजे वाढीव किमान वेतन या कामगारांना द्यावे यासाठी कामगार उपआयुक्तांनी महापालिका प्रशासनाशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. परंतु तरीही त्याचा उपयोग झालेला नाही आणि दुसरीकडे हे वेतन अदा करत नसताना नोंद मात्र तशी केली आहे. २१ भरपगारी रजा कामगारांना दिल्या जात नसल्याने किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नसताना दुसरीकडे मात्र दिशाभूल करून कर्मचाऱ्यांकडून फॉर्म भरून घेण्यात आले असा आरोप संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केला आहे. यासंदर्भात दुपारी बी. डी. भालेकर मैदान येथून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली. (प्रतिनिधी)