शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांसाठी असावे मंत्रालय

By admin | Updated: January 16, 2017 01:43 IST

ठराव : भटक्या विमुक्तांच्या दहाव्या संमेलनाचा समारोप

नाशिक : विमुक्त जाती, भटक्या जमातीचे प्रश्न सोडविण्यासाठी भटक्यांचे स्वतंत्र मंत्रालय असावे, असा ठराव करण्याबरोबरच समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरण जाहीर करावे, अशी मागणी भटक्या विमुक्तांच्या संमेलनात करण्यात आली. क्रांतिवीर वसंतराव नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात भटक्या विमुक्तांच्या संमेलनात दुसऱ्या दिवशी ‘भटक्या विमुक्त महिलांचा सर्वांगीण विकास शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या दुर्लक्षामुळे होत नाही हे खरे आहे काय?’ या विषयावर परिसंवादात विचारमंथन झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अ‍ॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी त्यांचे विचार मांडताना समाजाच्या तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार शिक्षण आदि विविध विषयांविषयीच्या ज्ञानाचा प्रसार होण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येक कुटुंबातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून, त्यासाठी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अत्यावश्यक आहे.