शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:30 IST

लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या निर्णयामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निर्णय निर्यात वाढ होऊन दर स्थिर होण्याची शक्यता

लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या निर्णयामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जानेवारीच्या तिसºया सप्ताहात केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे गेला सप्ताहभर कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत होती. लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागच्या सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले. परंतु श्रीलंकावगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नव्हती. यानंतर कांद्याचे निर्यातमूल्य हटवण्यात यावे यासाठी राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनीही केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.नोव्हेंबरअखेरपर्यंत देशात कांद्याचा दर सरासरी ३५ रु पये किलो पातळीवर होता. तेव्हा सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणून किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन केले होते. त्यानंतर ते ७०० डॉलर प्रतिटन असे खाली आले. तर आता कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्यात आल्याने कांद्याची निर्यात सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर वाढू शकतील.कृषि व प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) च्या आकडेवारीनुसार सन २०१७ च्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत देशातून १.०३ दशलक्ष टन कांद्याची निर्यात झाली होती. २०१६ साली याच कालावधीत देशातून १.३७ दशलक्ष टन कांदा निर्यात करण्यात आला होता. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत देशाने ३०.६८ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला गेला आहे.वर्षनिहाय झालेली निर्यात२००९ -१० - १८.७३ लाख टन२०१०-११ - १३.४० लाख टन२०११-१२ - १५.५२ लाख टन२०१२ -१३ - १८.२२ लाख टन२०१३ -१४ - १३.५० लाख टन२०१४ - १५ .- १०.८६ लाख टन२०१५ -१६ - १९.१४ लाख टनआॅक्टोबर २०१७ पर्यंत - १.०३ लाख टनकांद्याचे भाव कोसळत असताना योग्यवेळी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकºयांना दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे कांद्याचे कोसळणारे भाव थांबण्यास मदत होईल.- नानासाहेब पाटील, संचालक नाफेडसर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून

 भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित २० टक्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो.जिल्ह्यातून ७५ टक्के यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. यापैकी ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यापूर्वी किमान निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर निर्यातीमध्ये भरघोस वाढ झालेली होती.