शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत आनंदासाठी मन सकारात्मक असावे - स्वामी अद्वैतानंदजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

नाशिक : आनंदी रहायचे असेल तर मन सकारात्मक असावे,तरच स्वतःसह इतरांना आनंद द्याल,असा उपदेश चिन्मय आश्रमाचे स्वामी अद्वैतानंदजी यांनी ...

नाशिक : आनंदी रहायचे असेल तर मन सकारात्मक असावे,तरच स्वतःसह इतरांना आनंद द्याल,असा उपदेश चिन्मय आश्रमाचे स्वामी अद्वैतानंदजी यांनी केला.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. आनंदी जीवनाचा प्रवास या विषयावर स्वामी अद्वैतानंदजी यांनी नववे पुष्प गुंफले. मनुष्यास आनंद मिळतो, पण तो क्षणिक राहतो,बदलणाऱ्या जगात कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल ? परंतु आनंदी रहायचे असेल तर मन सकारात्मक असावे लागते, असेही स्वामी अद्वैतानंदजी म्हणाले. संत तुकाराम, ज्ञानोबा,रामदास स्वामी यांचा हवाला देऊन स्वामी अद्वैतानंदजी यांनी शरीराने कर्म करावे, इंद्रिये आणि मनावर तसेच वाकशक्तीवर ताबा ठेवण्याचे सूचित केले. याद्वारे जीवनात आनंद मिळू शकतो, विद्येद्वारे अन्न, वस्र, निवारा मिळेल,पण त्यातून सुख मिळेल याची शाश्वती नाही,असेही स्वामी अद्वैतानंदजी यांनी स्पष्ट केले. जगामध्ये भोग आहेत, पण त्यात दुःख अधिकच आहे. भोगे रोग भयं...म्हणूनच अध्यात्मातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतांच्या अभंगातून सुखाची प्राप्ती मिळते. ज्यास भगवंत प्राप्ती झाली, तो सुखाचा हक्कदार आपोआपच होतो, असा आशावाद स्वामी अद्वैतानंदजी यांनी व्यक्त केला. चिन्मय मिशनचे जगभरात कार्य आहे, परंतु स्वामी चिन्मयानंदजी यांनी दोन इंच जिभेवर हे मिशन उभे केल्याचे स्वामी अद्वैतानंदजी यांनी सांगितले. श्रीमंत माणसे आनंदी असतात, हा गैरसमज आहे,धन साधन आज साध्य आहे. शरीर,इंद्रिये मन,प्राण,बुद्धी,आणि चैतन्य या सहा वस्तू देवाने दिल्यात ,त्यावर आपला अधिकार असून त्याचा चांगला उपयोग केल्यास जीवन आनंदी राहील असेही स्वामी अद्वैतानंदजी यांनी स्पष्ट केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले तर संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान - कवीसंमेलन

विषय - कोरोनावरील काव्य

फोटो

०९स्वामी अद्वैतानंद