सध्या महापालिकेत एमआयएमचे ७ नगरसेवक निवडून गेले आहेत. डॉ. खालीद परवेझ यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल व डॉ. खालीद परवेझ यांनी शहरात एमआयएमचे संघटन सुरू केले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनता दल यांच्यापुढे एमआयएमने मोठे आवाहन उभे केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम मनपाच्या प्रभागांमध्ये कट्टर विरोधक म्हणून समोर येणार आहे. महापालिकेवर सध्या कॉंग्रेसची सत्ता आहे. कॉंग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएमने व्यूहरचना सुरू केली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पूर्व भागातील नागरिकांमध्ये एमआयएमची क्रेझ आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी व अकबर ओवेसी यांची मुस्लिम तरुणांमध्ये क्रेझ दिसून येते. कॉंग्रेसचा कट्टर विरोधक म्हणून एमआयएम समोर येत आहे. येत्या महापालिका निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
मालेगावच्या राजकारणात एमआयएमचे पारडे जड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST