शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा शिष्यवृत्ती घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:25 IST

आदिवासी विभाग : माहिती अद्यापही गुलदस्त्यातच ! नाशिक : राज्यात राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना बेकायदेशीर शिष्यवृत्ती वाटपप्रकरणी नाशिक व कळवण प्रकल्पांतर्गतही लाखोंचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. संबंधित शिष्यवृत्ती घोटाळ्याचा अहवाल आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर झाला आहे.

आदिवासी विभाग : माहिती अद्यापही गुलदस्त्यातच !नाशिक : राज्यात राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना बेकायदेशीर शिष्यवृत्ती वाटपप्रकरणी नाशिक व कळवण प्रकल्पांतर्गतही लाखोंचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. संबंधित शिष्यवृत्ती घोटाळ्याचा अहवाल आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर झाला आहे. या अहवालानुसार आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागातील नेमक्या किती शिक्षण संस्थांना अतिरिक्त शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले, याबाबत आदिवासी विकास विभागाची माहिती गुलदस्त्यात आहे.या सुमारे २१०० कोटींमधील नेमकी किती वसुली नाशिक विभागातील कथित राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांकडून करावयाची आहे, याची माहितीच आदिवासी विकास विभागाकडे नसल्याचे कळते. हा गोपनीय अहवाल प्रधानसचिवांकडे असल्याने नेमकी किती वसुली आहे, याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच समजेल, असे त्रोेटक उत्तर आदिवासी विकास विभागातील संबंधित कामकाज पाहणाºया कर्मचाºयाचे म्हणणे आहे. त्यामुळे नाशिक विभागातील नेमके कोणते मोठे मासे आहेत, ज्यांच्या शिक्षण संस्थांकडून ही शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करावयाची आहे, याबाबत आदिवासी विकास विभागाच्या वर्तुळात उत्सुकता आहे. नाशिकमध्ये राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसशी संबंधित अनेक राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या संस्था असून, त्यात लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे दरवर्षी वाटप केले जाते. यातील नेमक्या किती विद्यार्थ्यांना दुबार शिष्यवृत्तीचे वाटप होऊन त्यांच्याकडून नेमकी किती वसुली करावयाची आहे, याची आकडेवारी आदिवासी विकास विभागाच्या संबंधित कर्मचाºयाने देण्यास असमर्थता दर्शविल्याने याबाबत संशय बळावला आहे.चुकीने वाटप केल्याचा ठपका राज्यभरातील विविध राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शिक्षण संस्थांमधील शेकडो विद्यार्थ्यांना चुकीची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवून तसा अहवाल आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिवांकडे सादर केला होता. त्या अहवालानुसार अशा शिक्षण संस्थाकडून सुमारे २१०० कोटींची वसुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.नाशिक विभागातील नाशिक, कळवण, धडगाव, रावेर, अकोलेसह काही प्रकल्पांतर्गत येणाºया शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिष्यवृत्ती वाटप झाल्याची चर्चा आदिवासी विकास विभागाच्या वर्तुळात आहे.