शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातही लाखोंचा घोटाळा?

By admin | Updated: December 25, 2014 01:20 IST

आरोग्य विभागातही लाखोंचा घोटाळा?

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील शिक्षण विभागातील दुबार वेतनासह अन्य काही बाबतीत झालेल्या शिक्षण विभागातील लाखो रुपयांच्या घोटाळ्याप्रमाणेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वेतनवाढी व पदोन्नती दिल्याने लाखो रुपयांची अनियमितता झाल्याने त्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याचा अहवाल तयार करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.आरोग्य विभागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना चुकीच्या पदोन्नत्या व वेतनवाढी दिल्याने जिल्हा परिषदेचे व पर्यायाने शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटल्याचे कळते. तब्बल दोन डझन पानांचा हा चौकशी व तपासणी अहवाल बुधवारी (दि.२४) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे प्राप्त झाल्याचे समजते.(पान २ वर)इगतपुरी तालुक्यात शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने दुबार वेतन व प्रोत्साहन भत्ते काढल्याने एक कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याने तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यासह विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहायक यांच्यासह अर्ध्या डझनहून कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देताना शासन नियम व निकष न पाहताच वेतनवाढी देण्यात आल्याने त्यावर आक्षेप नोंदविण्यात आल्याचे कळते. त्यामुळे आरोग्य विभागाकडील सुमारे १०९ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संकटात सापडण्याची शक्यता आहे. तसेच या कर्मचाऱ्यांकडून नियमात न बसणाऱ्या वेतनवाढी मिळाल्याने मागील काळात त्यांना दिलेल्या वेतनवाढी पोटीच्या रकमेची वसुलीही या अहवालात प्रस्तावित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या घोटाळ्यानंतर आता पुन्हा आरोग्य विभागाचा वेतनवाढी संदर्भातील हा घोटाळा बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)