शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या वसुलीला अन् कारवाईला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:02 IST

निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना चुकीचे मूल्यांकन करून २६ लाखांचा बोजा सरकारी तिजोरीवर टाकणाºया चौघापैकी तिघा अधिकाºयांकडून २६ लाखांची वसुली काढण्याचा निर्णय जानेवारी २०१७ मध्ये झाला असताना आॅगस्ट २०१७ उलटूनही ही वसुली जमा झालेली नाही.

नाशिक : निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना चुकीचे मूल्यांकन करून २६ लाखांचा बोजा सरकारी तिजोरीवर टाकणाºया चौघापैकी तिघा अधिकाºयांकडून २६ लाखांची वसुली काढण्याचा निर्णय जानेवारी २०१७ मध्ये झाला असताना आॅगस्ट २०१७ उलटूनही ही वसुली जमा झालेली नाही. चुकीचे मूल्यांकन करताना दोषी अधिकाºयांना नोटिसा बजावण्यापुरताच कृषी अधिकाºयांवर कारवाई सीमित राहिल्याचे समोर आले आहे. हे एक प्रकरण माहितीच्या अधिकारात बाहेर आले. यासारखी अनेक प्रकरणे गुलदस्त्यात असल्याने कृषी विभागाची ‘झाकली मूठ लाखोंची’ असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.जानेवारी २०१७ मध्ये पुणे येथील कृषी आयुक्तालयाने चारही अधिकाºयांना नोटिसा बजावून २६ लाख १९ हजार ७५७ रुपयांची वसुली काढली आहे. या चार अधिकाºयांचा या लाखोंच्या वसुलीपोटी लेखी खुलासा कृषी आयुक्तालयाला प्राप्त झालेला असताना कारवाई करण्यासाठी विभाग आणि कृषी मंत्री कोणता मुहूर्त शोधत आहे? हाच प्रश्न आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी हेमंत काळे हे आता कृषी विभागाचे प्रमुख झाले आहेत. तर तत्कालीन कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे हे नंदुरबार जिल्हा आत्मा प्रकल्पाचे संचालक बनले आहेत. उर्वरित अधिकाºयांच्याही बदल्या झाल्या आहेत. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी एस. एस. गावित यांनी फळझाडांचे मूल्यांकन करताना नियम धाब्यावर बसविले. रामदास शिंदे यांच्या फळझाडांचे मूल्यांकन करताना रकाना क्रमांक ७ मध्ये द्राक्ष वेलीचा घेर ०.२० दर्शविण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार द्राक्ष वेलीच्या खोडाचा घेर ०.३० मी.पेक्षा कमी असल्याने मूल्यांकन करताना जळाऊ इंधन मूल्य घेणे अपेक्षित नाही. परंतु एस. एन. गावित यांनी मूल्यांकन करताना द्राक्ष वेलीचा घेर ०.२० मीटर इतका असतानाही रकाना क्र. २० मध्ये जळाऊ इंधन मूल्य ७५.२८ रुपये प्रतिवेल याप्रमाणे ग्राह्ण धरल्यामुळे शेतकºयास ६७२ वेलींचे रक्कम ५० हजार ५८८ अतिप्रदान झाले आहेत. इतकेच नव्हे तर द्राक्षवेलींवर फळांचे प्रतिहेक्टरी २५.०० टन उत्पादन धरावे, असे नमूद केले आहे. प्रतिहेक्टरी २५३८ वेली धरून प्रतिवेल सरासरी १० किलो उत्पन्न येते. या द्राक्ष पिकाची एकूण वयोमर्यादा १६ वर्षे गृहीत धरणे अपेक्षित आहे. मात्र एस. एन. गावित यांनी प्रतिवेल २० किलो उत्पादन धरून द्राक्ष पिकाची एकूण वयोमर्यादा १० वर्षे गृहीत धरून मूल्यांकन केले आहे. यामुळे गावित यांनी परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचे सिद्ध होते. एस. एन. गावित यांनी १६ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक अनियमितता केल्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. असेच नियमबाह्ण मूल्यांकन करून ६ लाख ६७ हजार ५८६ रुपयांच्या आर्थिक अनियमिततेस तालुका कृषी अधिकारी के. के. ढेपे यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी हेमंत काळे यांनाही चुकीच्या मूल्यांकनास जबाबदार धरून त्यांच्यावर २ लाख ६७ हजार ३५ रुपयांच्या आर्थिक अनियमिततेस जबाबदार धरण्यात आले आहे. या तीनही अधिकाºयांच्या मूल्यांकनास प्रमाण मानून जादाची नुकसानभरपाई दिल्याप्रकरणी या संपूर्ण प्रकरणात ५३ हजार ४०७ रुपयांच्या आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.