शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मनपाच्या झोळीत सव्वा कोटी

By admin | Updated: March 7, 2017 01:30 IST

नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून प्रचारयंत्रणेवर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली.

नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून प्रचारयंत्रणेवर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. उमेदवारांच्या या प्रचारखर्चामुळे महापालिकेच्याही झोळीत सुमारे सव्वा कोटींचे दान पडले आहे. अनेक उमेदवारांच्या जप्त अनामत रकमेपोटीही महापालिकेला लाखो रुपयांची कमाई झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली होती. त्यानुसार, निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या प्रचारासाठी रीतसर शुल्क भरून परवानगी घेणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी ना हरकत दाखले मिळविण्यात आले. त्यासाठीही शुल्क आकारले जात होते. शिवाय चौकसभा, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे लावणे, प्रचार वाहने यासाठी परवानगी आवश्यक करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेने सहाही विभागीय कार्यालात एक खिडकी योजना कार्यान्वित करत दरपत्रक जारी केले होते. महापालिका निवडणुकीत शहरात ठिकठिकाणी चौकसभा झाल्या, तर गोल्फ क्लबवर प्रामुख्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या. महापालिकेला या जाहीर सभा, चौकसभा,पोस्टर्स, बॅनर्स, प्रचार वाहने ना हरकत दाखले यांच्या माध्यमातून ६२ लाख ३६ हजार ९६८ रु पयांची कमाई झाली आहे. महापालिकेने उमेदवारांसह राजकीय पक्षांसाठी अंतिम मतदार याद्याही सीडी स्वरूपात उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यातूनही महापालिकेला सर्वाधिक कमाई झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेला उमेदवारांच्या अनामत रकमेतून ६७ लाख ७२ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यातील जप्त अनामत रक्कमही महापालिकेच्या खजिन्यात जमा होणार आहे.