शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घोरवड घाटात ५०० फूट खोल दरीत मालट्रक कोसळला

By admin | Updated: February 9, 2016 23:56 IST

घोरवड घाटात ५०० फूट खोल दरीत मालट्रक कोसळला

सिन्नर/पांढुर्ली : सिन्नर - घोटी मार्गावर पांढुर्लीजवळील घोरवड घाटात बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा मालट्रक सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. चालक व क्लीनरने मालट्रक दरीत कोसळण्यापूर्वीच उड्या मारल्याने ते बचावले. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.औरंगाबाद येथून किंगफिशर कंपनीच्या बिअरचे बॉक्स घेऊन मालट्रक (क्र. एमएच २० डीई २११६) हा मुंबईकडे निघाला होता. सिन्नरकडून तो घोटीकडे जात असताना पांढुर्लीजवळील घोरवड घाटात पहाटे ३ वाजेच्या सुमारास तो दरीत कोसळला. समोरील वाहनाच्या प्रखर प्रकाश-झोतामुळे ताबा सुटून ट्रक दरीत गेल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. चालक हृषीकुमार भरतलाल शहा (२३) व क्लिनर या दोघांनी प्रसंगावधान राखत ट्रक दरीत जात असल्याचे पाहून उड्या टाकल्या. त्यामुळे ते सुदैवाने बचावले. त्यात चालक हृषीकुमार शहा याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात मालट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालट्रक दरीतून बाहेर काढणे अतिशय जिगरीने बनले आहे. ट्रकमध्ये बिअरचा नेमका किती रुपयांचा माल होता याबाबत मालक आल्यानंतरच बिलावरून माहिती समजू शकेल. तथापि, त्यात ५ ते ७ लाख रुपयांचा बिअरचा माल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डी.बी. कोकरे, हवालदार एम. एम. देशमुख, एल. पी. धकाते, बी. के. झणकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रक सुमारे ५०० फूट खोल दरीत असल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत तो दरीतून काढण्यात आला नव्हता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)