शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात दूध टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:07 IST

खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देहिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील

खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.पूर्वीच्या माणसाची म्हण होती की घर तेथे खुटा म्हणजे प्रत्येक घरापुढे गायी, म्हशी, बैल असे पशुधन असले पाहिजे. अगदी राजे-महाराज यांच्या काळापासून वाड्यात गायी, म्हशी, पाळण्याची प्रथा प्रचलित होती. पूर्वी कोरड व्हावु शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. गावात अगदी मोजक्याच लोकांकडे अल्प प्रमाणात बागयती शेती होती. पावसाचे प्रमाण भरपूर असायचे, त्यामुळे गुरांना चरण्यासाठी रानात मोबलक चारा असायचा. शेतीशी निगडित दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असे.मोठ्या शेतकऱ्याकडे गुरे चारण्यासाठी घरातील किंवा सालाने एक माणूस राहत असायचा. त्यामुळे दूध मोठ्या प्रमाणात मिळत होते. गावातील ज्या लोकांकडे गायी असे त्या गावातील एक माणूस गायी चारण्यासाठी नेत असे त्यास गवाऱ्या म्हटले जात असे. त्याला गायी चारण्याचा मोबदला म्हणून पैसे, किंवा धान्य दिले जात होते.विज्ञान युगामध्ये शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. जिरायती शेतीचे बागायती झाली. त्यामुळे गायी, म्हशींना चरण्यासाठी मुबलक रान राहिले नाही. पावसाचे प्रमाण कमी-कमी होत चालल्याने चारा टंचाई जाणवू लागला आहे. गायी-म्हशींचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने, ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा -वीस गायी असायच्या त्यांच्याकडे आता एक किंवा दोन गायी-म्हशी आहेत.पूर्वी भरपूर प्रमाणात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला जात असे. दुधाचे पैसे हे आठवडयाला किंवा महिन्याला मिळतात. या दुधाच्या आलेल्या पैशातून शेतीतील माणसाची मजुरी, पिकासाठी औषधे व त्यांचा प्रपंच दुधाच्या येणाºया पैशातुन चालत असे. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने उन्हाळ्यात विहिरींना पाणी राहत नाही. त्यामुळे दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील झाल्याने गायी-म्हशी कमी झाल्या. जनावरांच्या किमतीही वाढल्या. घराघरात फ्रिज आल्याने तसेच बाजारात दुधाच्या पिशव्या मिळू लागल्याने दूध व्यवसायाकडे शेतकºयांने पाठ फिरवल्यामुळे दूधटंचाई जाणवू लागली आहे. (फोटो ०५ दुध, ०५ दुध १))