शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन वास्तूमधून पश्चिम वनविभागाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन‌् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची ...

ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन‌् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची वास्तू इ.स.१९२० सालापूर्वीचे बांधकाम असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. वनखाते हे ब्रिटिशकालीन खाते म्हणून आजही ओळखले जाते. या खात्याचे नाशिकचे रेंज कार्यालय १९२० साली ब्रिटिशांकडून हस्तांतरित करण्यात आले होते. वीटा, दगड मातीमधील हे बांधकाम काळानुरूप जीर्ण झाले असून, ठिकठिकाणी पडझड सुरू झाल्यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रशासनाने हे कार्यालयात ‘वन भवन’ अस्तित्वात येईपर्यंत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, उंटवाडी येथील विश्रामगृहाच्या आवारातील सभागृहात कार्यालयीन लिपिक वर्गाचे टेबल, तसेच पाठीमागील आवारात असलेल्या खोल्यांमध्ये वनक्षेत्रपाल, वनपाल, रेस्क्यू टीमचे कार्यालय विकसित करण्यात आले आहे, तसेच मुख्य विश्रामगृहाच्या तळमजल्यावर उपवनसंरक्षकांचे दालन विकसित करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील विश्रामखोल्या ‘जैसे-थे’ ठेवण्यात आल्या आहेत. सहायक वनसंरक्षकांचेही कार्यालयत नव्या जागेत स्थलांतरित केले जाणार आहे. या जागेवर ‘वनभवन’ साकारण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. वनभवनाच्या एकाच इमारतीत पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय राहणार आहे. वनभवनाची अद्ययावत सुसज्ज वास्तू साकारण्याचा प्रस्ताव नव्याने मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--

180721\18nsk_41_18072021_13.jpg

वनविश्रामगृहातील वनपालांचे नवे कार्यालय