शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उमराणे येथील आठवडे बाजाराचे स्थलांतर स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:12 IST

येथील आठवडे बाजार नूतन जागेत स्तलांतरित करण्यात आला असून, परसूल नदीकाठावरील आमराई येथे हा आठवडे भरविण्यात येत आहे. स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ सरपंच सोनाली देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ व पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते येथील खंडेराव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.

ठळक मुद्देयुती शासनाच्या काळात रुग्णालय मंजूर बाजारासाठी जागेची अडचण ट्रॅक्टरच्या साहाय्याने सपाटीकरण

उमराणे : येथील आठवडे बाजार नूतन जागेत स्तलांतरित करण्यात आला असून, परसूल नदीकाठावरील आमराई येथे हा आठवडे भरविण्यात येत आहे. स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ सरपंच सोनाली देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ व पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते येथील खंडेराव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.यापूर्वी सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाजवळील जागेवर आठवडे बाजार भरत होता; परंतु उमराणे येथे युती शासनाच्या काळात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने जागेअभावी हा प्रश्न शासनदरबारी बºयाच वर्षांपासून धूळ खात पडला होता. नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न असल्याने ग्रामपंचायतीने २००४ साली तीन एकर जागा ठरावाद्वारे ग्रामीण रुग्णालयासाठी दिली होती. परिणामी आठवडे बाजारासाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर पर्याय म्हणून पूर्वीची आमराई असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीची जवळजवळ साडेतीन एकर जागा आठवडे बाजारासाठी उपलब्ध करण्यात येऊन या जागेवर बुलडोझर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने सपाटीकरण करण्यात आले. आगामी काळात या परिसरात जॉगिंग पॉइंट तयार करण्याचा मानस बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांनी बोलून दाखविला. आठवडे बाजार शुभारंभप्रसंगी बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, जि. प. चे माजी सदस्य प्रशांत देवरे, माजी सरपंच रामदास देवरे, सुभाष देवरे, उपसरपंच प्रकाश ओस्तवाल, बाळासाहेब देवरे, सचिन देवरे, चिंतामण देवरे, नंदन देवरे, भरत देवरे, गोरक्षक सुनील देवरे उपस्थित होते.