शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

३५ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:08 IST

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.

ठळक मुद्देकसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराने शेतीसह दात्याणेत पूल, रस्ता गेला वाहून

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.कसबे व मौजे सुकेणेसह बाणगंगा काठच्या दीक्षी, दात्याणे, काटवन, थेरगाव, ओणे या गावांना बाणगंगेच्या महापुराचा तडाखा बसला आहे. कसबे सुकेणे येथील पूररेषेतील जोशीवाडा, भिलाटी येथील जवळपास ३५ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. या पूरग्रस्तांना दाऊदशहावली बाबा मंदिर व दशक्रिया विधी शेडमध्ये निवास व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे.सामाजिक कार्यकर्ते रतन शेवकर, तलाठी कार्यालय व ग्रामपालिकेने पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सोमवारी कसबे सुकेणे येथील पूररेषेअंतर्गत येणाºया नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर कसबे सुकेणेच्या तलाठी श्रीमती के.एम. पवार, सचिन कुलथे, रेशन दुकानदार अनिल नळे, ग्रामदक्षता दलाचे सचिन कुलथे, परेश भार्गवे, अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा पडोळ, स्वाती आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी शांताराम धुळे, जगन्नाथ जाधव, मेघनाथ हिरे आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिरासमोरील हॉटेल व टपºया, दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्याचे नव्याने केलेले डांबरीकरण वाहून गेले असून, सर्वत्र गाळ साचला आहे.जिल्हा प्रशासन फिरकलेच नाहीरविवारच्या पूरस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासन केवळ चांदोरी-सायखेड्यात तळ ठोकून होते. कसबे-सुकेणे येथील व परिसरात एकही वरिष्ठ अधिकारी किंवा आपत्ती निवारण पथक फिरकले नसल्याची माहिती पूरग्रस्तांनी दिली. महापूर म्हणजे केवळ सायखेडा, चांदोरी अशी धारणा जिल्हा प्रशासनाची झाली आहे. रविवारी सुकेणेसह तालुक्यातील विविध गावांचा संपर्क तुटला होता. चाटोरी, गोंडेगाव, शिरसगाव, शिंगवे, करंजगाव या गावात प्रशासन पोहोचले नसल्याचा आरोप होत आहे. केवळ चांदोरी बोटीमधून फिरून फोटोसेशन करून तालुक्याच्या पूरस्थितीचा अंदाज घेणाºया मंत्री, अधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. शेती गेली वाहून...मौजे सुकेणे येथील स्मशानभूमी- जवळील दिलीप माधवराव मोगल यांची सुमारे पाच गुंठे शेती बाणगंगेच्या पुरात पिकासह वाहून गेली आहे. शिवारातील द्राक्ष, टमाटा, फ्लॉवर, सोयाबीन पिके अजूनही पाण्याखाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.दात्याणे पूलगेला वाहूनदात्याणे गावातील गुरगुडे-पवार-धनवटे वस्तीला व खेरवाडी शिवाराला जोडणारा मुख्य पूल बाणगंगा महापुरात वाहून गेला असून, या भागाचा संपर्क तुटला आहे.