शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 18:55 IST

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

ठळक मुद्दे पेठ तालुक्यातील गावे लागली होरपळू; रोजगाराकरीता भटकंती सुरु

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

मातुलेस्वर पटांगनाचा, दुष्काळात जगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक शहरात व आजूबाजूच्या परिसरात पेठ हरसूल या तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंब स्थलांतरित होताना दिसताहेत असेच मातोरी गावातील मातुलेस्वर पटांगणात गेल्या दहा बारा दिवसापासून राहत असलेल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असे समजले कि पेठ तालुक्यातील गोटविहीर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची भीषण गैरसोय असल्याने तेथील सुमारे दोनशे लोकांनी आपल्या कुटुंबासह गाव सोडण्याचा निर्णय घेतला, गावात पाणी नाही चार ते पाच किलोेमिटर वरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याने जगायचे कसे व कुटुंबाला जगवायचे कसे हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुटुंबाला घेऊन गावातील तरुण तसेच जेष्ठ मंडळींनी गावातून काढता पाय घेत गावोगावी रोजंदारीवर काम करत उदरनिर्वाह करत आहेत.गावातील बहुतेक नागरिकांची मुले हि शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत परीक्षा संपून बहुतेक मुले सुट्यांमध्ये गावाकडे परतली आहेत, दरसाल सट्टीत मुलांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांच्या मते मुले आश्रमशाळेतच सुखी होते. गावाकडे पाणी नसल्याने आपल्याबरोबरीने त्यांनाही गावोगावी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, आज मातोरीत दिवसभर मिळेल ते काम करून हि मंडळी आपले जगण्याचे साधन करत आहे.१) आमच्या गावापासून दहा ते बारा किलोमीटरवर दमण नदी आहे, पण गावात पाणीपुरवठा नाही. पाण्यासाठी दूर जावे लागत असल्याने आम्ही आमची मुले घेऊन नाशिकला आलो आहोत.- संतोष भसरे (बोर पाडा)२) हंडाभर पाण्यासाठी खूप वनवन करायला लागत असल्याने खूप त्रास होतो, पूर्ण गावात व परिसरात पाणी कमी पडल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा पाऊस तेव्हाच गावाकडे जायचे असे आम्ही ठरविले आहे.- भारती भोये (गोठ विहीर)३) मतदान प्रचारासाठी आलेले पुढारी मतदान झाल्यावर आमच्या अडचणी विसरून जातात, गावाकडे वीज फक्त चार तास राहते पिण्यासाठी पाणी नाही, टॅकर पोहोचायल रस्ते नाही अशी अवस्था असल्याने आम्हाला जगण्याचा पर्याय शोधावा लागतो आहे.- देवराम गालफ (बोरपाडा)