शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटावर मध्यरात्री आयुक्तांची स्वारी

By admin | Updated: February 27, 2015 00:01 IST

प्रदूषणाचा धसका : अधिकाऱ्यांची उडविली झोप; ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर स्वच्छतेचे दिले आदेश

नाशिक : बुधवारी मध्यरात्री १२ वाजेची वेळ. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पावले गोदाघाटाकडे वळतात आणि अस्वच्छ, प्रदूषित गोदावरीचे आपल्या मोबाइल कॅमेऱ्यावरून धडाधड छायाचित्रे क्लिक करत अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठविले जातात आणि सोबत असतो गोदावरी स्वच्छता मोहीम तातडीने राबविण्याचा संदेश. येत्या शनिवारी (दि.२८) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि शुक्रवारी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह एका चर्चासत्राच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना प्रदूषित गोदावरीचे दर्शन घडू नये आणि महापालिकेच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडे निघू नयेत म्हणून हा सारा खटाटोप. गोदा प्रदूषणाचा धसका घेतलेल्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांची मध्यरात्री झोप उडविली आणि गुरुवारी सकाळपासूनच गोदाघाट स्वच्छतेसाठी यंत्रणा कामाला लागली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा कळीचा मुद्दा बनला आहे. पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीच्या प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत, तर राष्ट्रीय हरित लवादानेही वेळोवेळी गोदा प्रदूषणाबाबत महापालिकेला फटकारले आहे. संत-महंतांसह आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनीही अस्वच्छ गोदावरीबद्दल नापसंती दर्शविलेली आहे. त्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांसह शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी गोदास्वच्छतेसाठी आपला खारीचा वाटा उचलत आहेत. तरीही गोदावरीची अस्वच्छतेमुळे घुसमट सुरूच आहे. महापालिका प्रशासन मात्र वरवर मलमपट्टी करण्यातच धन्यता मानताना दिसून येत आहे. दरम्यान, येत्या शनिवारी हरित कुंभ समिती आणि महिला वकील यांच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात ‘पर्यावरण कायदा व मानवी जीवन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, या चर्चासत्रासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक (ज्यांच्यापुढे गोदावरी प्रदूषणासंबंधी याचिकेवर सुनावणी सुरू आहे) आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. खुद्द न्यायमूर्तींसह जलतज्ज्ञ नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने आणि त्यांच्याकडून गोदावरीची पाहणी केली जाण्याची शक्यता असल्याने गोदावरी प्रदूषणाचा धसका घेतलेल्या आयुक्तांनी बुधवारी मध्यरात्री थेट गोदाघाट गाठला आणि अस्वच्छ गोदावरीची धडाधड छायाचित्रे क्लिक करत अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठवून दिले. रात्री बारा वाजेनंतर निद्रेच्या अधीन झालेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्स अ‍ॅपची ट्यून वाजायला सुरुवात झाली आणि आयुक्तांच्या आदेशाने अधिकाऱ्यांची झोप उडाली. न्यायमूर्ती अभय ओक आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह कधीही केव्हाही गोदाघाटावर भेट देण्याची शक्यता असल्याने गुरुवारी सकाळपासूनच महापालिकेची सारी यंत्रणा कामाला लावा, जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरा, जेसीबी-पोकलॅण्ड जी काही मशिनरी उपलब्ध असेल, ती लावा पण गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे. या संदेशाने अधिकारी खडबडून जागे झाले आणि गुरुवारी सकाळपासून यंत्रणा कामाला लागेल, असे आयुक्तांना आश्वस्त करण्यात आले. पहाटेपर्यंत ही संदेशाची देवाणघेवाण सुरू होती. (प्रतिनिधी)