शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसी करणार वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:16 IST

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसणार आहे. यानिमित्ताने उद्योग नगरींची चाचपणी सरकारने सुरू केल्याची चर्चा असून, लवकरच महापालिकेबाबतदेखील निर्णय घेतला जाण्याची श्क्यता आहे.

ठळक मुद्देशासनाचा मिळकत कराबाबत निर्णय पन्नास टक्के उत्पन्नावर सोडावे लागणार पाणी

नाशिक : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसणार आहे. यानिमित्ताने उद्योग नगरींची चाचपणी सरकारने सुरू केल्याची चर्चा असून, लवकरच महापालिकेबाबतदेखील निर्णय घेतला जाण्याची श्क्यता आहे.नाशिक जिल्ह्यात ओझर, जानोरी, नागापूर, पिंपळगाव बसवंत, विंचूर, लासलगाव, सायने यांसह अनेक ग्रामपंचायती हद्दीत अनेक एमआयडीसीच्या माध्यमातून कारखाने उभारण्यात आले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील मिळकत करांमुळे बऱ्याच ग्रामपंचायती सधन आहेत. मात्र आता ग्रामपंचायत क्षेत्रातच औद्योगिक क्षेत्र असेल तर तेथील सामान्य आरोग्य रक्षण उपकर (स्वच्छता कर), दिवाबत्ती कर यांसह मालमत्ता कराची वसुली या ग्रामपंचायतींकडून होणार नाही तर राज्य शासनाच्या महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतींकडून करांची वसुली ही महामंडळ म्हणजेच एमआयडीसीच करणार आहे. महामंडळाने वसूल केलेल्या कराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीने स्वत:च्या ताब्यात ठेवून उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीस अदा करावीत, असे स्पष्ट आदेशच शासनाने १३ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीने आपला खाते क्रमांक संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समितीकडून प्रमाणित करून महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाला कळवायचे आहे.वादाची शक्यताग्रामपंचायतीच्या ऐवजी कर वसुली महामंडळाने करावी, असा शासनाचा निर्णय असला तरी यातून अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: थकबाकीदारांवर कारवाईचे अधिकार हे संबंधित ग्रामपंचायतीस असतात, त्याठिकाणी कारवाई कोण करणार असा प्रश्न आहे. कारण बहुतांशी बाबतीत ग्रामपंचायतीकडे कायदेशीर अधिकार आहेत.उद्योजकांनादेखील भुर्दंडऔद्योगिक क्षेत्रात यापुढे एमआयडीसी मुलभूत सेवा पुरवेल. मिळकत कर वसुलीतून त्यांना मिळणाºया उत्पन्नातही सेवा पुरवण्यास तूट आली तर महामंडळाला सेवा शुल्क आकारणीचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे उद्योगांचा मिळकत कर तर कमी होणार नाहीच उलट सेवा शुल्काचा भूर्दंड सोसावा लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसीgram panchayatग्राम पंचायत