शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला साडेतीन लाखांची घरफोडी

By admin | Updated: September 2, 2016 01:13 IST

कलानगर येथील घटना : सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

 पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने-चांदीचे दागिने तसेच अडीच लाख रु पये रोख असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.काल मंगळवारी दुपारच्या सुमाराला ही घटना घडली. याबाबत सीताराम निकम यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निकम यांचा दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरात छावाशौर्य इमारतीत फ्लॅट आहे. सुरगाणा येथील एका संस्थेत निकम पती-पत्नी शिक्षक असून, दोन दिवस सुट्या असल्याने निकम दाम्पत्य कलानगर येथे आले होते. येताना त्यांनी कदम नामक महिलेला फ्लॅट घेण्यासाठी आणलेले अडीच लाख रु पये व निकम यांच्या पत्नीचे सात तोळे सोने-चांदीचे दागिने आणले होते. दुपारी चार वाजता निकम हे सदनिकेत आले व तेथून कामानिमित्त चांदवड तालुक्यात नातेवाइकांकडे गेले होते. त्याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातून अडीच लाख रुपयांची रोकड व सात तोळे सोने-चांदीचे दागिने असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री निकम हे घरी परतले असता फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. आत प्रवेश केला असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यावरून घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत घरफोडी झाल्याची तक्रार दाखल केली. (वार्ताहर)