शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

म्हाळोबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By admin | Updated: February 18, 2016 23:16 IST

दोडी येथे रविवारपासून यात्रा : समितीची स्थापना

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत व सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवार (दि. २१) पासून यात्रेस प्रारंभ होत आहे. म्हाळोबा महाराज यात्रा समितीची नुकतीच बैठक होऊन उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. बोकडबळीमुळे राज्यभर सदरची यात्रा ओळखली जाते. म्हाळोबा महाराजांना मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षांपासून मंदिराचे लोकवर्गणीतून जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. सदर काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या सभामंडपात आकर्षक मार्बल्स बसविण्यात आली असून, लांबी वाढविण्यात आली आहे. यामुळे म्हाळोबा महाराजांचे मंदिर आकर्षकरीत्या सजले आहे.यात्रेव्यतिरिक्तही वर्षभर म्हाळोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरास रंगरंगोटी देण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तीनदिवसीय यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावून नवसपूर्तीसाठी बोकडबळी देत असतात. रविवारी रात्री भाविक गंगेचे पाणी आणून सोमवारी पहाटे म्हाळोबा महाराजांना अभ्यंगस्रान घालणार आहेत. रविवारी सकाळी देवाच्या मुखवट्याची व पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोल व व्हलाराच्या सनईवाद्यात निघणारी मिरवणूक आकर्षक ठरणार आहे. यावेळी भक्तगण धनगर गजनृत्य सादर करुन काठीमहाल नाचवित नेणार आहे. महिलांच्या हस्ते देवाची व काठीमहालाची पूजा करतात. त्यानंतर मुखवटा स्थापना करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी स्थानिक भगत असणारे शिंदे मंडळी नवसाचे बोकडबळी देतील.सोमवारी सकाळी माघ पौर्णिमेच्या दिवशी गादीचे व मुखवट्याचे पूजन केले जाणार आहे. दिवसभर मंदिरात होमहवन, आरती व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. वर्षभर म्हाळोबा महाराजांना जे भाविक नवस कबूल करतात ते बोकडबळीसाठी येथे येतात. यादिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व बोकडबळी दिले जातात. नवसपूर्तीसाठी महिला गळ खेळणे व लोटांगण घेणे आदि कार्यक्रम करतात. तळेगाव येथील भक्तगणांना गादीच्या देवाचा व काठीचा मान दिला जातो. राज्यभरातून येथे काठ्या येतात. पाऊल टेकडीपासून मंदिरापर्यंत काठीची देवास भेट घडविली जाते. त्यानंतर रात्रभर भगत मंडळी डफाच्या तालावर देवाची गाणी म्हणतात. मंगळवारी दुपारी तीन वाजता नामवंत मल्लांची कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. यात्रेत्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे दुकाने दाखल होण्यास सुुरुवात झाली आहे.यात्रोत्सव पार पाडण्यासाठी समितीचे पाराजी शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, कारभारी शिंदे, भारत शिंदे, कचरू शिंदे, रतन शिंदे, जानकू शिंदे, रभाजी जाधव, साहेबराव शिंदे, शिवाजी शिंदे, रायभान शिंदे, काशीनाथ शिंदे, मल्हारी शिंदे, सुभाष शिंदे, चंद्रभान जाधव, किसन शिंदे, बापू शिंदे, माधव शिंदे, मारुती शिंदे आदिंसह यात्रा उत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)गुणगौरव सोहळानाशिक : लेखा व कोषागार कर्मचारी कल्याण समितीच्या वतीने लेखाकोश दिनानिमित्त लेखा व कोषागरे कार्यालय परिवारातील अधिकारी, कर्मचारी यांच्या ६० पाल्यांचा शैक्षणिक व इतर क्षेत्रात नैपुण्य मिळविल्याबद्दल नुकताच गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक पंडितराव गवळी, बी. जी. वाघ, सुभाषचंद्र येवले, बाळासाहेब घोरपडे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य मिळविलेल्या व सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहसंचालक उत्तमराव कांबळे, बोधीकिरण सोनकांबळे, स्वरांजली पिंगळे, देवराव म्हस्के, तहसीलदार कैलास कडलग गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोषागार कार्यालयातील कामगार तसेच अधिकारी उपस्थित होते. अनेकांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)