शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोडी येथे म्हाळोबा महाराज यात्रोत्सव

By admin | Updated: February 10, 2017 00:09 IST

पालखी मिरवणूक : पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून नवसपूर्ती

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ३०० च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. बुधवारी रात्री सुमारे शंभर भाविकांनी निफाड तालुक्यातल्या तामसवाडी येथून गोदावरीचे पाणी आणले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी आठ वाजता कावडीद्वारे आणलेल्या गंगेचे पाणी पंचमृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सूरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रुक गावात येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौकाचौकात महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले. सुमारे चार तास चाललेल्या भव्य मिरणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील आबालवृद्धांसह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाळोबा महाराजांची विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत स्थानिक भगत मंडळींकडून सुमारे ३०० बोकडांचा बळी देण्यात आला. यावेळी म्हाळोबा महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला.बोकडबळीसाठी म्हाळोबा महाराज यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्षभर कबूल केलेले नवस फेडण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. मंदिरास रंगरंगोटी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाहेरगावाहून आलेल्या काठ्यांची भव्य मिरवणूक होवून त्यांची देवभेट घडविली जाते. बोकडबळी वधगृहातच देण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहे. मंदिर परिसरात अडथळे निर्माण केले असून, मंदिरात दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे, वावी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपनिरीक्षक व ५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काटेकोर बंदोबस्तासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहीका व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी व शनिवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)