शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एमजीव्ही, पवार फार्मसीला संयुक्त विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:40 IST

नॅशनल फार्मसी वीक २०१९ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पदवी गटातून यंदा एमजीव्हीचे पंचवटीतील फार्मसी कॉलेज व जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले.

नाशिक : नॅशनल फार्मसी वीक २०१९ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पदवी गटातून यंदा एमजीव्हीचे पंचवटीतील फार्मसी कॉलेज व जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले. तर पदविका महाविद्यालयांच्या गटातून एशियन इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी या महाविद्यालयाने यंदाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनची नाशिक शाखा व जिल्ह्यातील ३३ फार्मसी महाविद्यालये यांच्यातर्फे औषध निर्माणशास्त्र सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांनाना सोमवारी (दि.२१) दादासाहेब गायकवाड सभागृहातील दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी आमदार देवयानी फरांदे, औषधनिर्मिती उद्योजक भरत मेहता, आयपीएचे नाशिकचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप डेर्ले आदी उपस्थित होते. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या फार्मसी वीकमध्ये पदवी गटात भुजबळ नॉलेज सिटी संचलित फार्मसी कॉलेज व पदविका विभागात मविप्रच्या आडगाव येथील डी. फार्मसी महाविद्यालयाने उपविजेता किताब पटकावला.सप्ताहानिमित्त झालेल्या विविध २८ स्पर्धांत सुमारे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांपैकी एक ते दीड हजार विजेत्या विद्यार्थ्यांना विविध गटांतून पारितोषिके देण्यात आली. जिल्हाभरातील ३३ फार्मसी महाविद्यालयांत आयपीए नाशिक शाखेतर्फे यंदा फार्मासिस्ट फॉर हेल्दी इंडिया या संकल्पनेवर आधारित फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.यावेळी आयपीएचे सचिव डॉ. मिलिंद वाघ, डॉ. यू. व्ही. उशीर, एस. व्ही. अमृतकर, पी. जी. मोराणकर, डी. के. पाटील, ए. डी. मारु, डॉ. जी. एन. चौधरी आदींसह औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.औषधांविषयी जनजागृतीची गरज४फार्मसी वीकच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना देवयांनी फरांदे यांनी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये औषधांविषयी जागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच निश्चित प्रमाणापेक्षा अतिरिक्त अथवा कमी प्रमाणात औषधाचा डोस घेतल्याने लाखो नागरिकांचा मृत्यू होत आहे. हा विषय विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घेऊन नागरिकांमध्ये औषध वापराविषयी जागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक