शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार ग्राहकांनी पाठविले मीटर रिडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:08 IST

नाशिक : लॉकडाउनमुळे वीजमीटर रिडिंग करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याने ग्राहकांनी स्वत:हून आपले मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार ग्राहकांनी स्वत:हून आपले मीटर रिडिंग महावितरणला पाठविले.

नाशिक : लॉकडाउनमुळे वीजमीटर रिडिंग करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याने ग्राहकांनी स्वत:हून आपले मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार ग्राहकांनी स्वत:हून आपले मीटर रिडिंग महावितरणला पाठविले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणेदेखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रिडिंग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि ज्या ग्राहकांनी स्वत:हून वीज बिल पाठविले त्यांना त्याप्रमाणे वीज बिल पाठविण्याची व्यवस्था महावितरणने केली होती.महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडिंग पाठविले आहे. महावितरणकडे स्वत:हून मीटर रिडिंग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये नाशिक परिमंडळातील २५८३१ ग्राहकांनी वीज मीटर रिडिंग पाठविले. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाइल अ‍ॅप व वेबसाइटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.-------मोबाइल अ‍ॅपवर सुविधा उपलब्धडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन वेबसाइट आणि ‘महावितरण’ या मोबाइल अ‍ॅपवर ग्राहकांना मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठवून स्वत: रिडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक